तासगावकरांनी 50 वर्षात प्रथमच अनुभवला भयानक पाऊस 

For the first time Tasgaonkar experienced heavy rains
For the first time Tasgaonkar experienced heavy rains
Updated on

तासगाव  : तासगाव तालुक्‍यात गेल्या चोवीस तासाहून अधिक काळ पडत असलेल्या पावसाने अक्षरशः कहर केला. गेल्या चोवीस तासात रेकॉर्डब्रेक 86 मिमी पाऊस नोंदविला गेला. गेल्या पन्नास वर्षात प्रथमच इतक्‍या भयानक पाऊस तासगावकरानी अनुभवला. 

तासगाव शहरासह तालुक्‍याला बुधवारी रात्रभर पडलेल्या पावसाने धुवून काढले. सावळज मनेराजुरी, कवठेएकंद, येळावी, मांजर्डे, विसापूर यासह बहुतांशी भागात अभूतपूर्व अशा पावसाने तालुक्‍यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर जनावरे, गाड्या वाहून गेल्याच्या घटना नोंदविल्या गेल्या. रात्रभर पडलेल्या पावसाने घातलेल्या थैमानाचे चित्र सकाळी दिसले. मनेराजुरी तेथे चार जनावरासह गोठा वाहून गेला. मणेराजुरी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. मनेराजुरी, कवठेमहांकाळ, सांगली तासगाव रस्ते गुरुवारी उशीरापर्यंत बंद होते. अनेक द्राक्ष बागांमध्ये गुडघ्यावर पाणी साठले होते. सावळज परिसरात अग्रणी नदीकाठच्या शेतातील घरामध्ये पाणी शिरल्याने भर पावसात अनेकांना घराबाहेर पडावे लागण्याच्या घटना घडल्या. 

तासगाव कराड, तासगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, चिंचणी, तासगाव वासुंबे, हे प्रमुख रस्ते काही काल बंद पडले होते.  मणेराजुरी येथे चक्क ताकारी कालव्यात पाणी घुसून कालवा फुटला. राजापूर बोरगाव रस्त्यावरील येरळा नदीपुलाचा भराव वाहून गेला. ग्रामीण भागात द्राक्ष बागा शेतात कमरे इतके पाणी साठल्याचे चित्र दिसत होते. सखल भागातील शेतामध्ये पहावे तिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत होते. 

तासगाव शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने नागरिकांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली. मध्यवर्ती वाहणाऱ्या ओघळीचे पाणी चक्क गणपती मंदिरात शिरले. शहरातील पालिकेच्या शॉपिंग सेंटर मधील अनेक दुकानांमध्ये दोन दोन फूट पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शहरातील कापूर ओढ्याला आलेल्या महापूरात काठावरील गोठ्यातील चार म्हैशी पाण्यात बुडून जाग्यावर ठार झाल्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरात पाणीच पाणी सगळीकडे असे चित्र दिसत होते . कापूर ओढ्याला आलेले पाणी पहाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी झाली होती. सकाळी अकरा वाजल्यानंतरही काही प्रमाणात पाऊस पडतच होता. पावसामुळ सलग दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार थंडावले होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com