दोनशे वर्षात पहिल्यांदा तांबुतांची गळाभेट खंडीत..."कोरोना' चा परिणाम

संतोष कणसे 
Thursday, 23 July 2020

कडेगाव (सांगली)- "कोरोना' मुळे दोनशे वर्षात पहिल्यांदाच मोहर्रमनिमित्त होणारा गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटीचा सोहळा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. दोनशे वर्षात पहिल्यांदाच गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटीची परंपरा खंडीत होणार आहे. 

कडेगाव (सांगली)- "कोरोना' मुळे दोनशे वर्षात पहिल्यांदाच मोहर्रमनिमित्त होणारा गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटीचा सोहळा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. दोनशे वर्षात पहिल्यांदाच गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटीची परंपरा खंडीत होणार आहे. 

पोलीस ठाण्यात सोशल डिस्टन्सचे पालन करीत मोहर्रम ताबूत मालक व मोहरम ताबूत कमिटी यांची बैठक झाली. निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 
नगराध्यक्षा नीता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस उपस्थित होते. 
सामाजिक ऐक्‍याचे प्रतिक म्हणून महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसिद्ध मोहर्रमनिमित्त उंच ताबूत बांधकामाचा प्रारंभ बकरी ईददिवशी करण्यात येतो. येथे चौदा गगनचुंबी ताबूत बसवले जातात. निम्मे ताबूत हिंदूंचे असतात. मोहर्रमचा मान हिंदू म्हणजे देशपांडे, कुलकर्णी, सुतार, शेटे, शिंदे, देशमुख, माळी यांच्याकडे असतो. ताबूत बांधकामास एक महिना लागतो. ताबुतांची उंची 110 ते 135 फुट असते. 

यावर्षी मोहरम 30 ऑगस्टच्या दरम्यान आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोका लक्षात घेता दोनशे वर्षात पहिल्यांदा मोहर्रमनिमित्त होणारा गगनचुंबी तांबुतांच्या गळाभेटींचा सोहळा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते झाला. 
"कोरोना' मुळे मोहर्रम ताबूत मालक, मोहरम कमिटी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्याची ग्वाही दिली. कडेगावकरांचा निर्णय आदर्शवत असल्याचे पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस, नगराध्यक्षा नीता देसाई यांनी सांगितले. धनंजय देशमुख, साजिद पाटील, निखिल देशपांडे, संतोष डांगे, राजू दीक्षित, सिराज पटेल, फिरोज बागवान, नासिर पटेल, मुराद कडेगावकर, राजू इनामदार, समीर अत्तार, नजीर अत्तार यांच्यासह ताबूत मालक व नागरिक उपस्थित होते. 

 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in two hundred years, tabut meeting is broken . The result of "Corona"