मुळा धरणात मासेमारीस गेलेला तरुण बेपत्ता

 The fisherman drowned in the dam
The fisherman drowned in the dam
Updated on: 

राहुरी : चिंचाळे येथे मुळा धरणाच्या जल फुगवट्यात मासेमारी करताना आज सकाळी एक आदिवासी तरुण बुडाला. सायंकाळी सातपर्यंत त्याचा शोध सुरू होता. मात्र, त्याचा तपास लागला नाही. अंधार पडल्याने शोध थांबविण्यात आला असून, उद्या (रविवारी) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू होणार आहे. 


नानासाहेब रघुनाथ जाधव (वय 35, रा. चिपाची ठाकरवाडी, चिंचाळे) असे या तरुणाचे नाव आहे. रोज सायंकाळी पाच वाजता धरणाच्या जल फुगवट्यात मासेमारीसाठी जाळे पसरायचे. सकाळी सात वाजता जाळे काढण्यासाठी जायचे. सकाळी साडेनऊपर्यंत घरी परतायचे, असा त्याचा शिरस्ता आहे.

मालट्रकच्या चाकातील ट्यूबच्या साह्याने धरणाच्या पाण्यात उतरून, मासेमारीचे जाळी पसरविणे व काढण्याचा त्यांचा नित्यक्रम आहे. तो पोहण्यातही तरबेज आहे; मात्र त्याला फिट येण्याचा (मिरगी) आजार असल्याचे सांगण्यात आले. 


आज सकाळी साडेदहापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्यांचे वडील रघुनाथ जाधव व बंधू ग्रामपंचायत सदस्य घमा जाधव मासेमारीच्या ठिकाणी गेले. तेव्हा धरणाच्या काठावर नानासाहेबचे कपडे व चप्पल सापडली. परंतु तो कुठेच दिसला नाही. पाण्यातून मासेमारीचे जाळेही अर्धवट काढलेले दिसले. त्यामुळे त्यांनी मासेमारी करणारे स्थानिक तरुण भीमा जाधव, रावसाहेब जाधव, किरण जाधव, पाराजी जाधव यांच्या मदतीने होडीतून शोधमोहीम सुरू केली. 


सायंकाळी चारपर्यंत शोध लागला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब वडितके यांनी राहुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. सायंकाळी तलाठी भाऊसाहेब थोरात व दोन पोलिस तेथे पोचले. रात्री सात वाजता अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com