घुबड तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक; तीस लाख किमत; चिकोडीत कारवाई  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Five arrested in owl smuggling case; Three million price; Chikodi action

संशयितासोबत तीस लाख रूपयांत धुबड खरेदीचा सौदा ठरविण्यात आला होता.

घुबड तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक; तीस लाख किमत; चिकोडीत कारवाई 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : चिकोडी (जि. बेळगाव) येथून घुबड (Indian Eagel Owl ) विक्रीसाठी आलेल्या पाच आरोपीना सापळा रचून पकडण्यात आले आहे. त्याची तीस लाख रूपये किंमत असून दीड वर्षाचे हुमा जातीचे घुबड वन विभागच्या दक्षता पथक आणि पीपल फॉर ऍनिमल्स्‌ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही कारवाई केली. 


सुरज वडर ( वय 20, रा.निपाणी, जि.बेळगांव), अरुण कोरवी (33), संदीप कोरवी (25, रा. सदलगा, जि.बेळगाव), शुभम कांबळे (25, रा. कागल, जि.कोल्हापूर), मयूर कांबळे (22, रा.कडालगा, जि.बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, चिकोडी, निपाणी, बेळगांव, कोल्हापूर या भागात मोठया प्रमाणात वन्य जीव तस्करी केली जाते. पिपल फॉर अनिमल्सचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक लकडे यांना आपल्या विश्‍वनीय सूत्रांकडून घुबड विकण्यासाठी काही जण तयारीत आहेत अशी पक्की माहिती मिळाली. या बाबत वन्यजीव गुन्हे नियंत्रण मंडळच्या वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी बेळगाव वनविभागाच्या दक्षता पथकचे जिल्हा उपवन संवरक्षक शंकर कलोलीकर यांना माहिती देण्यात आली. 

श्री. लकडे, किरण नाईक, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड बसवराज होसगौडर व बेळगाव दक्षता पथक मिळून एकत्रित नियोजन करून चिकोडी येते सापळा रचला. बनावट ग्राहक म्हणून ऍड होसगौडर व वनअधिकारी सुरेश नाईक संशयितांना भेटले. संशयितासोबत तीस लाख रूपयांत धुबड खरेदीचा सौदा ठरविण्यात आला होता. हुमा घुबड असल्याचे खात्री झाल्यानंतर इशारा देताच मोठया शिताफीने दक्षता पथकने सर्व आरोपीना रंगे हात पकडले. 

 
 

loading image
go to top