esakal | सोलापूर ग्रामीणमध्ये पाचजणांचा मृत्यू! 'या' गावांमध्ये आज सापडले 159 पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

2corona_agencies_1.jpg

'या' गावांतील पाचजणांचा झाला मृत्यू 
माढा तालुक्‍यातील मुंगशी येथील 44 वर्षीय पुरुषाचा तर मोडनिंब येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. तर रातंजन (ता. बार्शी) येथील 75 वर्षीय पुरुषाचा, पंढरपुरातील कालिकादेवी चौक परिसरातील 55 वर्षीय पुरुषाचा आणि मोहोळ तालुक्‍यातील वाघोली येथील 70 वर्षीय पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर ग्रामीणमध्ये पाचजणांचा मृत्यू! 'या' गावांमध्ये आज सापडले 159 पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये शनिवारी (ता. 1) पुन्हा एकदा 159 रुग्णांची भर पडली आहे. आता ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार 812 झाली आहे. तर आज पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 108 झाली आहे. अक्‍कलकोट तालुक्‍यात दोन, बार्शीत सहा, मंगळवेढ्यात आठ, करमाळ्यात दहा, माढ्यात 24, माळशिरसमध्ये 18, उत्तर सोलापुरात 18 रुग्ण सापडले असून त्यात वडाळ्यातील 15 रुग्णांचा समावेश आहे. पंढरपूर तालुक्‍यात सर्वाधिक 30 तर मोहोळ तालुक्‍यात 21 रुग्ण आढळले असून त्यात वाघोलीतील 17 रुग्णांचा समावेश आहे.

अक्‍कलकोटमधील स्वामी विवेकानंद पार्क, संगोळगी (ब), बार्शीतील बारबोले प्लॉट, देशमुख प्लॉट, जामगाव रोड, सिध्दार्थ नगर, तुळजापूर रोड, वैराग येथे आज पुन्हा नव्याने रुग्ण सापडले. करमाळ्यातील भिमनगर, बायपास रोड, खडकपुरा, शेटफळ, माढ्यातील भांगे गल्ली, इंडसइंड बॅंकेजवळ, काटे वस्ती, माळी वस्ती, साठे गल्ली, सावली हॉटेलजवळ, शिकलकार गल्ली, शिवाजी नगर, शुक्रवार पेठ, तेली गल्ली, कुर्डूवाडी, खैराव, मोडनिंब, पापनस, रांझणी येथेही रुग्ण आढळले. माळशिरस तालुक्‍यातील अकलूज रोड, अकलूज, धर्मपरी, माळीनगर, संग्राम नगर, सवतगाव, उंबरे (वे), यशवंतनगर येथे, तर मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, मरवडे येथे, मोहोळ तालुक्‍यातील वाघोली व कामती बु. येथे नव्या रुग्णांची भर पडली. उत्तर सोलापुरातील डोणगाव, कळमण, वडाळा येथे, पंढरपुरातील भाईभाई चौक, भोसले चौक, डाळे गल्ली, गांधी रोड, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, जगदंबा नगर, जुनी पेठ, कुंभार गल्ली, लक्ष्मी नगर, माळी वस्ती, नाथ चौक, भुयाचा मारुती मंदिराजवळ, सांगोला रोड, संत पेठ, सारडा भवन, सिध्दीविनायक सोसायटी, उजनी कॉलनी, उत्पात गल्ली, विजापूरे गल्ली, झेंडे गल्ली, अढीव, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, मुंढेवाडी, शिरगाव, तर सांगोल्यातील परिट गल्ली, संगेवाडी आणि दक्षिण सोलापुरातील औज (अ), बिर्ला सिमेंट कंपनी, बोरामणी, दर्गनहळ्ळी, हिपळे, होटगी, मुस्ती या गावांमध्ये आज नव्याने रुग्ण सापडले.