esakal | या शाळेतील पाच लाख मुले घेतात पोषणआहाराचा लाभ 
sakal

बोलून बातमी शोधा

Five million children in this school receive nutritional benefits

या शाळेतील पाच लाख मुले घेतात पोषणआहाराचा लाभ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील 14 तालुके व महापालिका हद्दीतील एकूण 4544 शाळांतील एकूण 4 लाख 82 हजार 79 विद्यार्थी शालेय पोषणआहाराचा लाभ घेत आहेत. त्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. 

ही आहे आकडेवारी

राज्य सरकारतर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी शालेय पोषणआहार दिला जातो. त्यात जिल्ह्यात पहिली ते पाचवीच्या दोन लाख 91 हजार 329, तर सहावी ते आठवीपर्यंतच्या एक लाख 90 हजार 750, अशा एकूण चार लाख 82 हजार 79 विद्यार्थ्यांना शालेय पोषणआहाराचा लाभ दिला जात आहे.

हेही वाचा - तृप्ती देसाईंना कोण म्हणतंय हाणीन

निकृष्ट धान्याबाबतची तक्रार

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक शाळेला पोषणआहाराचा पुरवठा होतो. त्यामुळे शाळेत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांची आकडेवारी नव्याने येणाऱ्या आहाराच्या पुरवठ्याच्या वेळी तयार केली जाते. काही वेळा निकृष्ट धान्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत चौकशीची मागणी होत आहे. 

हे असं आहे

 तालुकानिहाय विद्यार्थी संख्या ः अकोले 456 27204, संगमनेर 460 51900, कोपरगाव 223 32438, राहाता 208 33483, राहुरी 314 34515, श्रीरामपूर 189 30576, नेवासे 318 43389, शेवगाव 272 29146, पाथर्डी 343 29080, जामखेड 202 18181, कर्जत 317 26058, श्रीगोंदे 427 32283, पारनेर 402 28083 
नगर 282 30804, नगर शहर 131 34939. 

loading image