धक्कादायक, दुधोंडीत आणखी पाच जणांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

पलूस तालुक्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुधोंडी गावात आज एका दिवसात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

सांगली ः पलूस तालुक्‍यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुधोंडी गावात आज एका दिवसात आणखी पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या गावातील एका ज्येष्ठ नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत निघाली आहे. 

आज एका दिवसात सापडलेले पाच कोरोना बाधित हे संबंधित नेत्यांचे कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील काहीजण कार्यकर्त्यांचे शेजारी आहेत. हे सारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे ते बाधित झाले आहेत. गेल्या आठवड्यात दुधोंडी गावात कोरोनाने प्रवेश केला. एका बड्या राजकीय नेत्याला कोरोनाची बाधा झाल्याने गावात एकच खळबळ माजली होती. कारण, या नेत्याचा जनसंपर्क दांडगा आहे. ते अनेकांच्या संपर्कात आले होते.

त्यामुळे दुधोंडीपासून सांगलीपर्यंत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील अनेकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज मिळाला असून आणखी पाचजणांना बाधा झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five more corona positive in dudhondi

Tags
टॉपिकस
Topic Tags: