बेळगावात आणखी पाच पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

बेळगाव जिल्ह्यात आज आणखी नव्या पाच रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 झाली आहे. गुरुवारी ही संख्या 36 होती.

बेळगाव ः जिल्ह्यात आज आणखी नव्या पाच रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41 झाली आहे. गुरुवारी ही संख्या 36 होती. त्यामध्ये आज (ता.18) 5 रुग्ण वाढल्यामुळे संसर्ग रुग्णांची संख्या 41 झाली आहे.
बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात हे रुग्ण मिळाले आहेत. दरम्यान, कर्नाटक राज्यात 24 तासात 44 रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्ण 359 झाले00 आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी बाधितांची संख्या 36 होती, आज परत पाच रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी सकाळी पहिली यादी जाहीर झाली, त्यामध्ये 38 रुग्ण आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण, यामध्ये बेळगावमधील रुग्ण आढळून आला नव्हता. पण, सायंकाळी दुसरी यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये बेळगाव कॅम्पमधील पाच रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण कॅम्पमधील आहेत. त्यांचे अनुक्रमे वय 34, 17, 46, 37 आणि 38 आहे. कोरोनाबाधित रुग्णांशी या बाधित रुग्णांचा संपर्क आल्याचे म्हटले आहे.

दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात कॅम्पमधील तरुणाने मार्च महिन्यांत सहभाग नोंदविला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपचार सुरु होते. पण, या रुग्णाच्या अन्य सदस्य संपर्कात आले होते. त्यांना ताप, खोकल्याची लक्षणे होती. त्यासाठी संशयितांच्या घशातील स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्यानतंर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील उपचार सुरू केले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five more positive in Belgaum