ब्रेकिंग ! शहरातील पाच सावकारांना अटक; त्रासाला कंटाळून घर सोडून गेलेल्या 'यांनी' दिली फिर्याद 

1_1561375001_0.jpg
1_1561375001_0.jpg

सोलापूर : चिंचोळी एमआयडीसी परिसरात पॅकेज ड्रिकिंग वॉटर प्लॅण्ट सुरु केला. त्यासाठी एका खासगी सावकाराकडून पैसे घेतले. त्याचे पैसे फेडण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून रक्‍कम घेतली. त्याच्या त्रासाला कंटाळून पुन्हा तिसऱ्या सावकाराकडून 60 लाख 65 हजार रुपये व्याजाने घेतले. त्यातील 37 लाख 50 हजार रुपयांची परतफेड करुनही आता सावकार 99 लाख 98 हजार रुपयांची मागणी करीत असल्याची फिर्याद संतोष नरसिंग श्रीराम यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यानुसार पाच खासगी सावकारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापुरातील अमोल जगताप याने स्वत:सह पत्नी व दोन मुलांना गळफास देऊन ठार मारले. त्यानंतर शहर पोलिसांनी खासगी सावकारांबद्दल तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्रीराम यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार श्रीनिवास महांकाली यलदी (रा. शास्त्री नगर), कासिम म.शरिफ नालबंद (रा. शनिवार पेठ), दिलीप अजमेर गायकवाड (रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी क्रमांक सहा), किरण माणिक जाधव (रा. लिमयेवाडी) आणि राहूल मारुती सर्वगोड (रा. मोदी हुडको) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, अशा गुन्ह्यांमधील आणखी काही आरोपीस (खासगी सावकार) अटक केली जाणार आहे, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. 

'अशी' आहे हकिकत 
संतोष श्रीराम यांनी एमआयडीसी चिंचोळी येथे सहा हजार 500 स्केअर फूट जागा 95 वर्षांच्या करारावर घेतली. त्यानंतर 2016 मध्ये 250 मिली पॅकेज ड्रिकींग वॉटर प्लान्ट टाकला. त्यासाठी फेब्रुवारी 2017 मध्ये त्यांनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले. मात्र, त्याने पैशांसाठी तगादा लावल्याने दुसऱ्या सावकाराकडून ज्यादा व्याजाने पैसे घेतले. तर त्याचे पैसे देण्यासाठी पुन्हा तिसऱ्या सावकाराला गाठले. अशाप्रकारे खासगी सावकाराकडून 60 लाख 65 हजार रुपये घेतले आणि त्यातील 37 लाख 50 हजार 500 रुपयांची परतफेड केली. मात्र, आज ते सावकार 99 लाख 98 हजार रुपये असल्याचे सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी वारंवार फोनवरुन, समक्ष शिवीगाळ व दमदाटी केली. पत्नीच्या जबदरस्तीने स्वाक्षऱ्या घेऊन कोरे स्टॅम्प व धनादेश घेतले. पत्नीसमोर शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर 11 डिसेंबर 2019 रोजी घरातून निघून गेलो. मित्र अमोल जगतापने सावकारांच्या त्रासातून आत्महत्या केल्याचे समजातच सोलापुरात आल्याचेही श्रीराम यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com