त्यांची साद : काम करून द्या, नाहीतर जगण्याची सोय करा

five thousand peddlers will take to the streets : prithiraj pawar
five thousand peddlers will take to the streets : prithiraj pawar

सांगली ः कोरोना संकट काळात फेरीवाल्यांनी संयम राखला आहे, मात्र आता जगण्यामरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे सारे लोक रस्त्यावर उतरतील. त्यांना मान्यता द्या किंवा मग जिल्हा प्रशासनाने त्या साऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी, अशी जाहीर मागणी भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी आज केली. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या आवारात आज दुपारी फेरीवाल्यांची बैठक झाली. पृथ्वीराज पवार यांच्यासह नगरसेविका स्वाती शिंदे, सुरेश टेंगले, मुसाभाई, चंद्रकांत सूर्यवंशी, रेखा पाटील प्रमुख उपस्थित होते. सर्व भाजीपाला, हातगाडी, फास्टफूड व किरकोळ विक्रेते यांच्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. शहरांमध्ये या सर्व संघटनांचे मिळून किमान पाच हजार नोंदणीकृत सभासद आहेत. शासनाच्या फेरीवाला धोरणांतर्गत त्यांचे सर्व्हे झाला आहे. त्यांचे नोंदणी करण्याचे काम झालेले आहे. 

श्री. पवार म्हणाले,""आम्ही सर्व संघटनांनी गेली दोन ते अडीच महिन्यांपासून 100 टक्के शासनाच्या निर्णयानुसार लॉकडाऊन पाळलेला आहे. आमचे हातावरचे पोट आहे. कोणताही संघर्षाचा प्रसंग घडू दिला नाही. शहरातील दुकानदार व व्यापारी संघटनांनी शासनाच्या निर्णयास आव्हान देऊन सुरू करण्याचे जाहीर करताच शासनाने त्याची त्वरित दखल घेतली. काही अटी शर्तीस अधीन राहून दुकाने उघडण्यास परवानगी दिली. आज आम्ही पाच ते सहा हजार कुटुंब गेली दोन ते अडीच महिने उपासमार सहन करत आहेत. हातउचल, कर्ज काढून घरसंसार चालवित आहोत. आता आमची शासनास विनंती आहे आम्हाला रीतसर व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.'' 

ते म्हणाले,""काही अटीशर्ती चर्चेतून ठरवून द्याव्यात. आम्ही त्याचे काटेकोर पालन करू. अन्यथा आता आमचे समोर दोनच पर्याय शिल्लक आहेत. शक्‍य तेवढा सोशल डिस्टन्सिंग ठेवून, सॅनिटायझिंग करून व्यवसाय सुरू करू. त्याला विरोध झाला तर आम्ही सर्व कुटुंबीयांसह पुढच्या आठवड्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर राहू. आम्हाला संस्था क्वारंटाइन करून आमचे खाणे पिणे, मुलांचे शिक्षण व वैद्यकीय खर्चासहित सर्व ती जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com