या जिल्ह्यातील पाच हजार एसटी कर्मचारी वेतनाविना

 Five thousand ST employees in this district without pay
Five thousand ST employees in this district without pay
Updated on

सांगली : "लॉकडाउन' काळात प्रचंड तोटा सहन कराव्या लागलेल्या "एस. टी.' महामंडळासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अधिकारी, कर्मचारी यांना मे महिन्याच्या वेतनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. शासनाने निधी मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात खात्यात अद्याप वेतनाची रक्कम जमा झाली नाही. जिल्ह्यातील जवळपास पाच हजार अधिकारी व कर्मचारी प्रतिक्षेत आहेत. 

राज्य परिवहन महामंडळ अलीकडे तोट्यात आहे. तो भरून काढण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. उत्पन्न वाढवण्यासाठी 1 मार्च ते 30 एप्रिलअखेर भारमान वाढवा अभियान सुरू केले होते. परंतू मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच "कोरोना' मुळे सुरवातीला फेऱ्यांची संख्या कमी करावी लागली. 24 मार्चपासून एसटी बसेस सेवा बंद करण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या काळातच तोटा सहन करावा लागला. 

लॉकडाउन शिथील केल्यानंतर जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली आहे. एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले आहे. परंतू एका फेरीमध्ये बऱ्याचदा तेवढेही प्रवासी भरले जात नाहीत. त्यामुळे सध्या नेहमीपेक्षा अधिक तोट्यात बसेस धावत आहेत. तसेच मालवाहतूक देखील एसटी ने सुरू केली आहे. परंतू त्यालाही फारसा प्रतिसाद नाही. एसटीचा तोट्याचा फेरा काही चुकला नाही. सध्या प्रत्येक आगारात वर्कशॉपचा स्टाफ सोडला तरी "रोटेशन' पद्धतीने चालक-वाहकांना ड्युटीवर बोलवले जाते. उत्पन्न नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन खात्यात जमा होते. परंतू दोन आठवडे उलटले तरी अद्याप वेतन झाले नाही. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांचे बॅंकेचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उधारीची वेळ आली आहे. शासनाने निधी मंजूर केला असला तरी प्रत्यक्षात हातात वेतन येण्याची प्रतिक्षा लागली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Government Hospital Accident
Sangli Ganesh Visarjan
Who is Yuvraj Adityaraje Patwardhan?
Vasumbe Road Accident Father And Son Killed In Two Wheeler Crash Mother Seriously Injured After Tempo Collision
Marathi News Esakal
www.esakal.com