सह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी!

सह्याद्रीच्या जंगलातील पाचही गावे कोरोनामुक्त; स्वयंशिस्तीचा जंगल पॅटर्न
सह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी!

सांगली : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या चितांचा दाह अस्वस्थ करीत असताना, पश्चिम घाटातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून (paschim ghat) आणि चांदोलीच्या घनदाट (chandoli forest) जंगलातून एक मनाला तजेला देणारी बातमी समोर आली आहे. वाघ आणि बिबट्यांचे सख्खे शेजारी असणाऱ्या येथील पाच गावांनी कोरोनाला आपल्या वेशीवरच (covid-19 control) रोखले आहे. सुमारे एक हजार ९०० इतकी लोकसंख्या असलेल्या या गावांमध्ये आजअखेर एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. या गावांची पारंपरिक जीवनशैली आणि स्वतःभोवती आखलेले नियमांचे कडेकोट रिंगण यामुळे ही गावे कोरोनावर भारी ठरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील खुंदलापूर (sangli district) आणि जनाईवाडी, तर सातारा जिल्ह्यातील (satara) पाथरपुंज, मळे आणि कोळणे ही ती पाच गावे (five village) आहेत. या जंगलात पाच वाघ, ५३ हून अधिक बिबटे, असंख्य गवे आणि हजारो जंगली श्वापदे आहेत. हे लोक या दुर्गम वातावरणाशी एकरूप आहेत. त्यांच्या जगण्याच्या आनंदाला कृत्रिम गरजांचे लेबल नाही. त्यामुळे असे संकट आल्यास स्वतःवर निर्बंध लादून घेताना त्यांना त्रास होत नाही. आपल्यासाठी निर्बंध वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी रोजच्या जगण्याचा भाग आहेत. या गावांचा दुर्गमपणा, तेथील मोकळी हवा, अजिबात गर्दी नसणे आणि लोकांची पारंपरिक जीवनशैलीनुसार वहिवाट ही या गावांच्या कोरोनामुक्त राहण्याची मुख्य कारणे आहेत.

सह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी!
आठ तरुणांच्या जिद्दीला सलाम; राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाची टीम करतेय शेती

महाराष्ट्रातील (maharashtra) सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांत पाच गावांचा समावेश होतो. त्यामुळे पावसाळ्यात चार महिने ही गावे लॉकडाउनसारखीच (lockdown) जगापासून तुटलेली असतात. हे लोक पावसाळ्यापूर्वी सहा महिने पुरेल एवढा किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा घरी करून ठेवतात. ही पारंपरिक सवय त्यांना या संकटकाळात आता उपयोगाला येत आहे. कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असल्याचे लक्षात येताच, येथील लोकांनी चार-सहा महिने पुरेल एवढा किराणामाल आणि आवश्यक वस्तू आपापल्या घरी आणून ठेवल्या आणि घरातून बाहेर जाणे बंद करून टाकले.

या गावांतील कुणीही व्यक्ती गाव सोडून बाहेर जात नाही आणि बाहेरचा व्यक्ती अपवाद वगळता गावात येत नाही. इथली काही तरुण मुलं पुण्या-मुंबईला नोकरीनिमित्त आहेत. त्यातील एखादा गावाकडे आलाच, तर त्याला सक्तीने १० दिवस शाळेत क्वारंटाईन (quarantine) केले जाते. इथले लोक स्वयंशिस्त तर पाळतातच, शिवाय अतिशय कमी गरजांवर जगण्याची त्यांना आता सवय आहे. त्यामुळे आधुनिक साधनांचा हव्यास किंवा छानछोकी जीवनशैलीचा मोह त्यांना गावापासून दूर घेऊन जात नाही.

काम काय करतात..?

ही पाच गावे जंगली भागात मोडतात. येथे भौतिक सुविधा फार कमी आहेत. मोबाईल आलाय, पण रेंज नाही. काही घरांवर डीश टीव्हीच्या छत्र्या आहेत. लोकांच्या रोजगाराचे मुख्य साधन हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि चांदोली जंगल परिसरातील वन विभागाच्या कंत्राटी पद्धतीच्या नोकऱ्यांवर अधिक अवलंबून आहे. या परिसरात टायगर रिझर्व्हच्या २४ कुट्या आहेत आणि त्या ठिकाणी ४८ कर्मचारी नियुक्त आहेत. हंगामानुसार वणवा लागू नये आणि लागला तर वेळीच त्यावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी काही कर्मचारी नियुक्त केले जातात. काही महिला शासकीय योजनेतून शिलाईकाम करतात. काहींना अलीकडेच पर्यटन वाढीसाठी गाईड म्हणून काम मिळालेय. काही तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे-मुंबईला असले तरी या संकट काळात त्यांचे गावाकडे येणे जवळपास थांबले आहे, असे सरपंच तुकाराम गावडे सांगतात.

सह्याद्रीच्या जंगलातील वाघोबाचे शेजारी, कोरोनावर भारी!
ढिंग टांग: फूल और पत्थर!

एका जाणिवेतून सावध

सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते सांगतात, इथले जंगल भागातील रहिवासी लोक कोरोना संकटाविषयी सर्व ती माहिती जाणून आहेत. त्यांना भीती आहे की आपणास हा आजार झाला तर आरोग्यसुविधा आपल्यापर्यंत पोचतील का? आपण आजारी पडलो, तर आपली योग्य सोय होईल का? त्यामुळे या आजारापासून दूर राहणे चांगले आणि त्यासाठी जे जे करता येईल ते ते लोक करतात. गावात कोरोना नाही, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे गावातील स्थानिकांशी संपर्काबाबत ते फार घाबरत नसले, तरी बाहेरून कोणी येणार नाही आणि गावाबाहेर कोणी जाणार नाही, याबाबत त्यांची दक्षता लक्षवेधी आहे. त्यामुळेच खुंदलापूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील मणदूर गावात ९० कोरोनाबाधित रुग्ण असताना, या गावात मात्र एकही रुग्ण नाही, हे या स्वयंनियंत्रणाचेच फळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com