esakal | विखे पाटील कारखान्याच्या वीज प्रकल्पास आग, पाच कामगार जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Five workers injured in fire at Vikhe Patil factory power plant

या आगीत झालेल्या नुकसानीची माहीती चौकशी नंतर समोर येईल. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले अाहेत. कारखाना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांनी सांगितले.

विखे पाटील कारखान्याच्या वीज प्रकल्पास आग, पाच कामगार जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणी ः पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने बिओटी तत्वाने चालविण्यास दिलेल्या ऊर्जा प्रकल्पास आग लागली. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. या आगीत पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमींना लोणी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले आहे. 

कारखान्याने वीजनिर्मितीसाठी सदर प्रकल्प एका कंपनीस चालविण्यात दिला आहे. प्रकल्पात सकाळी साडेअकरा वाजता वेल्डींगचे काम सूरू असताना आजूबाजूस पडलेल्या भुश्यावर पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागली. प्रवरा कारखान्यासह संगमनेर, अशोक, कोळपेवाडी, संजीवनी या कारखान्यांसह राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निश्माक पथकाने एका तासात आग आटोक्यात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.

या आगीत झालेल्या नुकसानीची माहीती चौकशी नंतर समोर येईल. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांवर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले अाहेत. कारखाना त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांनी सांगितले.
आगीची माहीती मिळताच कारखान्याचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने घटनास्थळी देवून आग विझवण्याकामी मदत केली. जखमींवरील उपचारासाठी तातडीने सूचना दिल्या. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.