
तासगाव : गव्हाण (ता. तासगाव) येथे श्री लक्ष्मीदेवीच्या यात्रेत आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीतील बैलगाडीचा ताबा सुटून दोन बैलांसह बैलगाडी तलावात जाऊन कासऱ्याचा फास लागल्याने दोन्ही बैलांचा दुर्दैवी अंत झाला. बैलगाडी शर्यतीचे सर्व नियम पायदळी तुडवत घेण्यात आलेल्या शर्यतीमध्ये दोन मुक्या जीवांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.