कोल्हापूरकडे जाणारी रेल्वे मिरजेत थांबविल्याने प्रवाशांचे हाल

Passenger-Railway
Passenger-Railway

भाळवणी - सोलापूर-कोल्हापूर जाणारी रात्री 11 :35 ची गाडी मिरजमध्ये पहाटे चार वाजता थांबविण्यात आली. या गाडीत प्रवाशांना गाडी मिरज पर्यंत असल्याची पूर्वसूचना न देता त्यांच्याकडून कोल्हापुरचे तिकीटे घेण्यात आले आहे अशी माहिती चडचणचे प्रवासी हनुमंत मालगर यांनी दिली आहे.

तिकीट काढताना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सदर गाडी कोल्हापूरपर्यंत आहे अशी पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना सुद्धा त्यांनी कोणतेही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे असंख्य प्रवासी या ठिकाणी अडकून पडले आहेत. काही प्रवाश्यांनी बसने कोल्हापूरला जाणे पसंद केले. कोल्हापूर भागात पाऊस जोरात झाला असल्याने पंचगंगा नदीला पूर आला आहे.

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर जयसिंगपूरच्या पुढे पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर जाणाऱ्या रेल्वे थांबवण्यात आले आहेत. याठिकाणी उतरल्यानंतर प्रवाशांना मार्गदर्शन कक्ष नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत होते. प्रवाशांना मदत करण्याऐवजी त्यांना केअरलेस वागणूक मिळत आहे.

लातूर येथून आलेले रमेश पवार, दिलीप पवार सोलापूर हुन आलेले मेघराज रेवडकर, गुरुराज रेवडकर, नागेश पवार, राजशेखर पोळ तर कुर्डूवाडी येथून आलेले सुरज माने, अभिषेक माने यांनी रेल्वे स्टेशनला तिकीट काढताना गाडी कोल्हापूर ला जाते का असे विचारून तिकीट काढले त्यावेळीसुद्धा त्यांना पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे सांगितले. 

मिरज स्टेशनमध्ये ड्युटिएसिस्टंट यांना विचारले असता चार ऑगस्टपासून ११:४५ पासून कोल्हापूर जाणारी रेल्वे बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या फुलावर पाणी आल्याने गाड्या सोडल्या जात नसल्याचे सांगून प्रत्येक स्टेशनला आमचा मेसेज गेला असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com