Video : प्रजासत्ताक दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात तिरंगी ध्वजाप्रमाणे सजावट

अभय जोशी
Sunday, 26 January 2020

झेंडू शेवंती आणि स्प्रिंगर या तीन फुलांचा या सजावटीसाठी प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आणि मुलांनी केलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

पंढरपूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध आकर्षक फुलांनी तिरंगी ध्वजाप्रमाणे सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण-उत्सवाच्या बरोबरच 15 ऑगस्ट , 26 जानेवारी रोजी देखील फुलांची आकर्षक सजावट केली जाते. पुणे येथील सचिन अण्णा चव्हाण मोरया प्रतिष्ठान यांच्या वतीने सुमारे दीड टन फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली आहे.

झेंडू शेवंती आणि स्प्रिंगर या तीन फुलांचा या सजावटीसाठी प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आणि मुलांनी केलेली ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

कोल्हापूर येथील अरुण बाबुराव पाटील आणि राशीन येथील रजेंद्र भगवान लंगोटे या दोन भाविकांनी स्वखर्चातून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर विद्युत रोषणाई ही करून दिली आहे. ही विद्युत रोषणाई 26 जानेवारी पासून माघि यात्रा  संपेपर्यंत ठेवली जाणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flower decoration in Vittthal Mandir at Pandharpur