फुले महाग, हारांचे दर आवाक्‍याबाहेर... ऐन गणपतीत फुले महागल्याने भाविकांतून नाराजी

प्रमोद जेरे 
Wednesday, 26 August 2020

मिरज (सांगली)-  फुलांचे दर महागल्याने ऐन गौरीगणपतीच्या सणामध्ये हारांचे दर गगनाला भिडले आहेत. बऱ्याच वर्षांनी फुलांना चांगला दर मिळाल्याने बळीराजा खुश आहे. पण ही दरवाढ आवाक्‍याबाहेर असल्याने भक्त मात्र नाराज आहेत. यामध्ये हार बनवून विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे हाल सुरू आहेत. महागडी फुले घेऊन हार करुन ठेवले तरी ते विकले जात नसल्याची विक्रेत्यांचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच यावर्षीचा गौरी-गणपतीचा सण बळीराजासाठी थोडाफार सुखाचा तर भक्तांना नाराज करणारा ठरला आहे. 

सणासुदीत फुलांना चांगला दर मिळतो हे खरे पण उत्पादन जास्त झाल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेली फुले तसेच वाहनभाड्याचे पैसेही मिळत नसल्याने रस्त्यावर टाकून द्यावी लागतात. यावर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी लॉकडाऊन काळात फुलांची लागवडच केली नाही. याच लॉकडाउनमुळे सणवारही होणार नाहीत असे समजून अनेक शेतकरी फुलांच्या शेतीपासून दूर राहिले. साहजिकच फुलांचे उत्पादन कमी झाले. काही थोडीफार फुले पिकली ती पावसाच्या तडाख्यात सापडली ज्यामुळे उत्पादनात आणखी घट झाली. या सगळ्याचा परिणाम हा बाजारातच फुले अतिशय कमी प्रमाणात येण्यावर झाला. मुंबई पुणे आणि कोल्हापुर मार्केटला मिरजपेक्षा आधिक दर मिळत असल्याने तेथेही स्थानिक शेतक-यांनी फुले पाठवणे पसंत केले. याचा परिणाम साध्या हारापासुन ते सजावटीपर्यंत सगळ्यावर झाला. 

फुलांचे दर (प्रतिकिलो) 
शेवंती -------200 ते 250 रुपये 
झेंडु (पिवळा) --------200 ते 250 रुपये 
झेंडु (केशरी) --------180 ते 200 रुपये 
गलाटा - 150 ते 170 रुपये 
निशीगंध - 400 ते 450 रुपये 
गुलाब (प्रति शेकडा) 400 ते 500 रुपये 
 
यावर्षी फुलांना चांगला दर मिळाला हे मान्य. पण ज्यावेळी शेतकऱ्याला दर नाही म्हणून फुले रस्त्यावर टाकून जावे लागते. त्यावेळी शेतकऱ्याच्या या नुकसानीबाबत कोणीही काही बोलत नाही. शेती ही कधीतरीच लाभाची ठरते हेच यावेळी सिद्ध झाले. 
राजेंद्र कोल्हापुरे, फुल उत्पादक शेतकरी, मालगाव 
---------------- 

शेतकऱ्यास दर मिळाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर येते. ग्राहकाला छोट्या हाराचा दर वीस रुपये सांगितला तर आश्‍चर्य वाटते पण यामध्ये हार बनविणाऱ्या विक्रेत्याला कोणी वाली नाही. गौरीगणपतीमध्येच ग्राहकांनी पाठ फिरवल्याने पुढचे सणवार कसे जाणार याची चिंता वाटते आहे. 
- नागेश कोपार्डे, हार विक्रेता, फुल मार्केट, मिरज 
 
संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers are expensive, rates of garlands are out of reach.