Food poisoning : यात्रेच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा! एकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती स्थिर

food poison
food poisone sakal
Updated on

कऱ्हाड : वहागाव (ता. कऱ्हाड) येथे घरगुती यात्रेच्या जेवणात २० ते २५ जणांना विषबाधा होऊन एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्रास होत असलेल्या नातेवाइकांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गावाला अनेक वर्षांची मांसाहारी यात्रा जेवणाची परंपरा असताना प्रथमच घडलेल्या या घटनेने वहागावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तुकाराम विठ्ठल राऊत (वय ७०, रा. वहागाव, ता. कऱ्हाड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

food poison
Eknath Shinde: जाहिरातीतून फडणवीस गायब! शिंदे गटाचे नेते म्हणतात, फडणवीस-शिंदे भावाभावाप्रमाणे काम करतात

याबाबत वैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी दिलेली माहिती अशी की, वहागाव येथे शुक्रवारी (ता. ९) रात्री तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या घरी नातेवाइकांच्या देवाच्या यात्रेचा जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांचे वहागाव, विंग, अभयचीवाडी, विटा- यतगाव आदी ठिकाणचे सुमारे ३० ते ३५ मित्र व नातेवाईक हे त्याठिकाणी जेवणासाठी आले होते.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवार (ता. १०) २० ते २५ जणांना पोटदुखी, ताप, उलटी व जुलाबाचा त्रास जाणवू लागला. यावेळी राऊत यांच्यासह अन्य जणांना कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी राऊत यांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, त्या वेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

food poison
Sharad Pawar : लग्न होत नसल्यामुळे पवारांना मारण्याची धमकी; तपासातून धक्कादायक खुलासा

दरम्यान, वहागाव येथे जेवण केलेल्या वहागावसह कऱ्हाड, विंग, विटा याठिकाणच्या मित्र व नातेवाइकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काहींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये विटा येथील नातेवाइकांच्या दोन लहान मुलांचा समावेश असून, त्यांची प्रकृती स्थिर असून, सध्या त्यांच्यावर विटा येथे उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, घटनास्थळाचे गांभीर्य ओळखून आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा साथ अधिकारी डॉ. भगवान मोहिते, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तेथील परिस्थितीची योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना केल्या.

विषबाधेचे नेमके कारण अस्पष्ट...

दरम्यान, पाच टीमद्वारे आरोग्य विभागाने आज गावचा सर्व्हे केला. मात्र, या घडलेल्या विषबाधा प्रकारचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी जेवणात वापरलेले साहित्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील चव्हाण यांनी सांगितले.

घरगुती यात्रेत जेवण केलेल्या ग्रामस्थांनी स्वतःला काही लक्षणे आढळल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तत्काळ उपचार घ्यावेत

- डॉ. सुनील चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com