द्राक्ष बागायतदार अत्यंत संकटातून जात आहे. त्यातूनही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची टिकण्यासाठी धडपड सुरू आहे.
तासगाव : यावर्षी द्राक्षशेती समोर अखंड अस्मानी संकटांची मालिका सुरू आहे. अशा परिस्थितीत यावर्षी द्राक्ष हंगामाचे काय होणार, असे वाटत असतानाच द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. द्राक्ष बाजारात येऊ लागली असून, सावळजचे द्राक्ष (Grape) उत्पादक शेतकरी नितीन तारळेकर (Farmer Nitin Tarlekar) यांच्या निर्यातक्षम ‘सुपर सोनका’ला ११० रुपये एक किलो असा दर मिळाला असून, ‘यूएई’ला (UAE) द्राक्ष निर्यात होऊ लागली आहेत.