माजी महापौर हारूण शिकलगार यांचे निधन

जयसिंग कुंभार
Wednesday, 29 July 2020

सांगली- सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांचे आज आकस्मिक निधन झाले. मिरजेतील खासगी हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. श्री. शिकलगार यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

सांगली- सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांचे आज आकस्मिक निधन झाले. मिरजेतील खासगी हॉस्पिटलमध्ये आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. श्री. शिकलगार यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

सांगलीच्या खणभागातच नव्हे कानाकोपऱ्या संपर्क असलेले हारुणभाई व्यापक जनसंपर्क असलेले नगरसेवक होते. गेल्या टर्ममध्ये त्यांना महापौरपदाची संधी मिळाली त्यावेळी जनमाणसातून त्यांच्याबद्दल व्यक्त झालेली भावना त्यांच्या त्या लोकसंपर्काची साक्ष होती. 
सांगली,मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची संयुक्त महापालिका झाली आणि या महापालिकेची धुरा नगरपालिकेप्रमाणेच कै. मदन पाटील यांच्याकडे आली. मदन पाटील यांच्या बिनीच्या शिलेदारांमधील एक म्हणजे हारुणभाई. महापालिकेच्या गेल्या वीस वर्षात ते तीनवेळा नगरसेवक म्हणून विजयी झाली. एकदा त्यांच्या पत्नी विजयी झाल्या. 
मदन पाटील यांनी त्यांना दिलेला महापौर पदाचा शब्द नेत्या जयश्री पाटील यांनी पुर्ण करताना त्यांना खुल्या प्रवर्गातून पदाची संधी दिली. अर्थात हारुणभाईंना आरक्षणाच्या आधाराची गरज नव्हती. सांगलीच्या खणभागात शिकलगार कुटुंबियांचे राजकीय वर्चस्व हारुणभाईंचे वडिल अजिजभाईंपासूनचे. अजिजभाईंनी कॉंग्रेसला कात्रजचा घाट दाखवत नगराध्यक्षपद पटकावले. मात्र त्यांच्या पश्‍चात हारुणभाईंनी राजकारणात प्रवेश करताना कॉंग्रेससोबतच वाटचाल केली.2016 ते 2018 या काळात त्यांना महापौरपदाची संधी मिळाली. या काळात त्यांनी पाणी पुरवठा योजनेचा 70 एमएलडीचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची कारकिर्द कॉंग्रेसअंतर्गत राजकारणाने वादळी ठरली. मात्र कॉंग्रेसची महापालिकेतील सत्ता त्यांनी आबाधित ठेवली. 
तळागाळातील सर्व जाती-धर्माच्या जनतेशी असलेला त्यांचा घट्ट संपर्क हीच त्यांची राजकीय ताकद होती. सकाळी सातपासून त्यांच्या घरात गाऱ्हाणे घेऊन गर्दी जमलेली असायची. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Mayor Harun Shikalgar passes away