सांगलीत माजी महापौर कोरोना बाधित...दुपारपर्यंत मनपा क्षेत्रात 41 रूग्ण 

बलराज पवार 
Wednesday, 29 July 2020

सांगली- महापालिका क्षेत्रात आज दुपारपर्यंत एकूण पॉझिटिव्ह 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये "जीएमसी' मिरजकडील 31 आणि मेट्रोपॉलिसी लॅबकडून 11 जणाचे रिपोर्ट "पॉझिटिव्ह' आले आहेत. तसेच माजी महापौर देखील कोरोना बाधित असून त्यांना मिरजेतील कोविड रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर सर्वत्र औषध फवारणीसह खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

मंगळवारी महापालिकेतील एका नगरसेवकाच्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा माजी महापौर देखील कोरोना बाधित असल्याचे आढळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल केले आहे. त्यानंतर आज दुपारपर्यंत महापालिका क्षेत्रात आणखी 41 रूग्ण आढळले. 

आज सापडलेल्या रुग्णांमध्ये संजयनगर 8, चांदणी चौक 4, आप्पासाहेब पाटील नगर 5, शनिवार पेठ 1, कामानवेस 1, कोल्हापूर रोड सांगली 2, कुपवाड रोड 1, वसंत नगर 1, लाले प्लॉट सांगली 2, सावंत प्लॉट 1, वसंत नगर कुपवाड 1, हरिपूर रोड पवार प्लॉट 1, जीएमसी गर्ल्स हॉस्टेल 2, गवळी गल्ली 2, वारणाली 2 याचबरोबर सांगली 2 आणि मिरज 1, कुपवाड 1 येथील रूग्णांचा समावेश आहे. या परिसरात रुग्ण सापडल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी तातडीने पुढील उपाययोजनांच्या सूचना प्रशासनाला दिल्या. याचबरोबर अनेक ठिकाणी भेटी देत आयुक्त कापडणीस यांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former mayor of Sangli Corona affected . 41 patients in the municipal area till noon