माजी आमदार धनाजी साठे  उद्या पुन्हा कॉंग्रेसमध्ये? 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 15 जानेवारी 2020

माढा (जि. सोलापूर): माढ्याचे माजी आमदार तथा संत कुर्मदास कारखान्याचे अध्यक्ष ऍड. धनाजीराव साठे हे गुरुवारी (ता. 16) कॉंग्रेस पक्षात परतण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

माढा (जि. सोलापूर): माढ्याचे माजी आमदार तथा संत कुर्मदास कारखान्याचे अध्यक्ष ऍड. धनाजीराव साठे हे गुरुवारी (ता. 16) कॉंग्रेस पक्षात परतण्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
साठे यांनी नुकतीच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सत्कार केला. शिवाय लातूरचे पालकमंत्री व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांचाही त्यांनी सत्कार केला. माढा शहरातही अमित देशमुख यांच्या अभिनंदनाचे डिजिटल लागले असून त्यावर मित्र प्रेम ग्रुपकडून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. शिवाय माजी आमदार धनाजीराव साठे यांनी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या दोघांच्या भेटी घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुरुवारी (ता. 16) सहकारमहर्षी गणपतराव साठे यांच्या जयंतीदिनीच सोलापूर येथे कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी आमदार धनाजीराव साठे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसने डावलल्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी भाजप पुरस्कृत माढा विधानसभा निवडणूक लढवली होती. सध्या दादासाहेब साठे यांच्याकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्षपद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former mla dhanaji sathe enter in congress again tomorrow