
Sangli Municipal Corporation Commissioner : सांगली महापालिकेचे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांचा कारभार भ्रष्ट होता. त्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यांनी मनमानी कारभार केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यांच्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार असून त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याचीही मागणी करणार असल्याचे माजी खासदार संजय पाटील यांनी आज सांगितले. तसेच उपायुक्त वैभव साबळे यांचा ‘आका’ कोण, हे शोधणेही आवश्यक आहे, असे ते म्हणाले.