सांगली रोझावाडी येथे माजी सरपंच यांचा कोरोनामुळे मृत्यू...

घनशाम नवाते
Friday, 24 July 2020

मिरज कोविड रूग्णालयात मृत्यू झाला.  तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.

बागणी (सांगली) - रोझावाडी (ता. वाळवा ) येथील कोरोना पाॅझटीव्ह आलेल्या माजी सरपंच (वय 51 ) यांचा उपचारा दरम्यान मिरज कोविड रूग्णालयात मृत्यू झाला.  तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. गावातील कोरोनामुळे गेलेला हा पहिलाच बळी ठरला असून त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व मुलगी यांचा कोरोना अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहे.

संबंधित रूग्ण कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तिच्या संपर्कात आल्याचे समजताच संबंधित परिसर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कंटेमेंन्ट झोन करून तत्काळ त्यांना 20  रोजी मिरज कोविड रूग्णालयात दाखल केले होते.

हेही वाचा- कोरोनाचा फटका; बलवडीच्या शेतकऱ्याने विकल्या 34 गाई -

त्यांचा गावातील अनेक लोकांशी संपर्क आला होता. त्यामुळे गावात धाकधूक वाढली आहे. काल रात्री पासून संबंधित रूग्णांची तब्येत खालवली होती. आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former sarpanch first death due to coronavirus at rozawadi sangli district