रोझावाडीतील माजी सरपंच कोरोना पॉझिटिव्ह 

अमोल पवार 
Wednesday, 22 July 2020

एकूण बाधित रूग्णांची संख्या 3 झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेमेंन्ट झोन घोषित केला आहे.

बागणी (सांगली) ः रोझावाडी (ता.वाळवा) येथील माजी सरपंचाना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या आधी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात ते आले होते. त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळल्याने गावात भितीचे वातावरण आहे. 

एकूण बाधित रूग्णांची संख्या 3 झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेमेंन्ट झोन घोषित केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका राजमाने यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी रोझावाडीत वेगवेगळ्या पातळीवर सर्वेक्षण करीत आहेत. 

संबधित व्यक्तिला आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्याने सोमवारी (ता.20) त्यांना इस्लामपूर येथे स्वॅब तपासणी साठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केले होते. परंतु संबधित रुग्ण इस्लामपूर येथे क्वारंटाइन न होता परस्पर घरी आले होते. संबंधित माहिती आरोग्य विभागास मिळताच त्यांना काल मिरज कोविड रूग्णालयात दाखल केले होते. 

रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला आहे. गावातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग कठोर मेहनत घेत आहे. संबंधित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी करून क्वारंटाइन करणे, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून औषध फवारणी ही कामे गावात होत आहेत. 

संपादन ः शैलेश पेटकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Sarpanch of Rozawadi Corona Positive