ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्ये शहरातील यंत्रमागधारकांनी लाखो रुपयांचे यंत्रमाग अक्षरशः २५ रुपये किलो दराने भंगारात विकले आहेत. अनेक वर्षे यंत्रमाग व्यवसाय नुकसानीत सुरू आहेत.
विटा : हातमागापासून शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या शहरातील यंत्रमाग व्यवसायाला (Power loom Business) घरघर लागली आहे. वस्त्रोद्योगाबाबत केंद्र व राज्य अनिश्चित असलेले धोरण, सतत होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे शहरातील (Vita City) साडेचार हजारांहून अधिक यंत्रमागाची (Power loom) विक्री झाली आहे. तर, काहींनी भंगारात घातले आहेत. उर्वरित तीन ते साडेतीन हजार यंत्रमाग अडचणींचा समाना करत सुरू आहेत. त्यांनाही कुशल कामगारांची टंचाई भासत आहे.