esakal | भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

four dead in accident at karnataka balakot.gif

विजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजी बिळगी गावातील रहिवासी कार गाडीने धारवाड येथील न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावानजीक आले बेळगावहून गुलबर्गाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या कार गाडीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

भल्या पहाटेच चार जणांवर काळाचा घाला, समोरून बस आली आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मांजरी : विजापूर येथून धारवाडला न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात जागीच चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना  शुक्रवारी पहाटे  घडली.  

हे पण वाचामटण खाताय, मग ही बातमी वाचाच ; मृत कोंबड्या, मेंढ्याच्या मटणाची विक्री

हनुमंत गुनगार (२१), बाळापा शिगाडी  (२४),  सिद्धराय तेली (३६), रियाज जालगेरी (२५ ) अशी अपघाता ठार झालेल्यांची नावे आहेत.  हे सवर् विजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजीबिळगी गावातील रहिवासी  आहेत.

हे पण वाचाएक न्यारं गाव ; त्याचं शेळकेवाडी नाव

याबाबत मुधोळ पोलिस स्थानकातून मिळालेली माहिती अशी, विजापूर जिल्ह्यातील गोटे व खाजी बिळगी गावातील रहिवासी कार गाडीने धारवाड येथील न्यायालयीन कामासाठी जात असताना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील शिरोळ गावानजीक आले बेळगावहून गुलबर्गाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून जात असताना समोरून येणाऱ्या कार गाडीला जोराची धडक दिली. या जोराच्या धडकेत कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, कारमधील सर्वच मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना खूप परिश्रम घ्यावे लागले.  घटनास्थळी मुधोळ पोलिसांनी भेट देऊन घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.
 

loading image