सोलापूर शहरात चौघांचा मृत्यू ! 473 पैकी 38 व्यक्‍तींचे अहवाल पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे
Wednesday, 29 July 2020

ठळक बाबी... 

  • शहरात आतापर्यंत आढळले चार हजार 823 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 32 हजार 108 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट; 356 रुग्णांचा झाला मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील दोन हजार 951 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 516 रुग्णांवर उपचार सुरु 
  • बुधवारी आढळले 38 पॉझिटिव्ह; 65 वर्षांवरील चौघांचा मृत्यू 
  • प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या 

सोलापूर : शहरातील 473 व्यक्‍तींचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले असून त्यामध्ये 38 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. दुसरीकडे मात्र, अक्‍कलकोट रोडवरील गांधी नगरातील 70 वर्षीय पुरुषाचा, हत्तुरे वस्ती परिसरातील 68 वर्षीय पुरुषाचा, काडादी चाळ येथील 71 वर्षीय पुरुषाचा आणि जुना विडी घरकूल परिसरातील 65 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

भारतमाता नगर (होटगी रोड), कुर्बान हुसेन नगर, गुरुदत्त हौसिंग सोसायटी (गुरुनानक चौक), जीवन विकास नगर, सम्राट अशोक सोसायटी (कुमठा नाका), रेसिडेन्सी क्‍वार्टर (सिव्हिल हॉस्पिटल), नेहरु नगर, द्वारका नगरी (विजयपूर रोड), अशोक चौक (नरसिंह मंदिराजवळ), कन्ना चौक टॉवरजवळ, राघवेंद्र नगर, योगीराज नगर (पुना रोड), वामन नगर (जुळे सोलापूर), अनिता नगर (गवळी वस्ती), लक्ष्मी चाळ (देगाव रोड), सेटलमेंट फ्रि कॉलनी क्रमांक तीन, जवाहर अपार्टमेंट (शांतीसागर मंगल कार्यालयाजवळ), सिध्देश्‍वर नगर (मजरेवाडी) आणि मित्र नगर (शेळगी) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

शहरातील 222 प्रलंबित अहवाल 
शहरातील एक लाख व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्टे महापालिकेने ठेवले आहे. मात्र, अद्याप नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यात महापालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे दररोज एक हजार व्यक्‍तींची टेस्ट करण्याचे टार्गेट असतानाही त्या सातत्य राहिलेले नाही. मंगळवारी (ता. 28) शहरातील 473 व्यक्‍तींचीच टेस्ट करण्यात आली. रुग्णांच्या संपर्कातील 222 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

ठळक बाबी... 

  • शहरात आतापर्यंत आढळले चार हजार 823 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 32 हजार 108 व्यक्‍तींची कोरोना टेस्ट; 356 रुग्णांचा झाला मृत्यू 
  • आतापर्यंत शहरातील दोन हजार 951 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 516 रुग्णांवर उपचार सुरु 
  • बुधवारी आढळले 38 पॉझिटिव्ह; 65 वर्षांवरील चौघांचा मृत्यू 
  • प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four killed in Solapur city and 38 reported corona positive