मृत्यू थांबता थांबेनात! आज पुन्हा चौघांचा मृत्यू; 49 व्यक्‍तींना कोरोनाची लागण 

तात्या लांडगे
Friday, 10 July 2020

ठळक बाबी... 

 • शहरातील 15 हजार चार व्यक्‍तींची आतापर्यंत झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत रुग्णांची संख्या तीन हजार 75; एक हजार 698 रुग्णांची कोरोनावर मात 
 • शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 81 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • रुग्णांच्या संपर्कातील 277 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; सोलापुकरांची वाढली चिंता 
 • आज (शुक्रवारी) चौघांचा मृत्यू; मृतांची संख्या आता 296 
 • लक्ष्मी पेठेतील बल्लारी चाळ, धाकटा राजवाडा, स्वामी विवेकानंद नगर आणि समाधान नगरातील प्रत्येकी एकाचा मृत्यू 

सोलापूर : शहरात शुक्रवारी (ता. 10) नव्याने 49 रुग्णांची भर पडली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. आता शहरातील रुग्णांची संख्या तीन हजार 75 झाली असून त्यापैकी 296 व्यक्‍तींचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 277 संशयित व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 

'या' नगरात सापडले नवे रुग्ण 
धनराज गिरजी रुग्णालय, भाग्यश्री पार्क, बेघर वसाहत (होटगी रोड), आकाश नगर (तोडकर वस्ती), बालाजी सोसायटी, जुनी मिल सोसायटी, उत्तर कसबा, कोर्णाक नगर, गिता नगर (जुळे सोलापूर), बुधवार पेठ, दक्षिण कसबा (दत्त चौक), स्वामी विवेकानंद नगर, सेटलमेंट कॉलनी क्र. एक (रामवाडी), जोशी गल्ली, डांगे रेसिडेन्सी, बनशंकरी नगर, गौतम नगर (शेळगी), शहा नगर झोपडपट्टी, मराठा वस्ती, वर्धमान नगर (भवानी पेठ), कर्णिक नगर, उत्तर सदर बझार, सिध्दार्थ सोसायटी, बिलाल नगर (सैफूल), न्यू पाच्छा पेठ, मारुती गल्ली (बाळे), केगाव, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), रंगरेज नगर, झिशान हॉस्पिटल, कोटणीस नगर (विजयपूर रोड), माधव नगर, सुंदरम नगर, होटगी रोड, म्हाडा कॉलनी, नरसिंह नगर (मोदी), शुक्रवार पेठ, काडादी चाळ येथे आज नवे रुग्ण सापडले आहेत.

ठळक बाबी... 

 • शहरातील 15 हजार चार व्यक्‍तींची आतापर्यंत झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत रुग्णांची संख्या तीन हजार 75; एक हजार 698 रुग्णांची कोरोनावर मात 
 • शहरातील विविध रुग्णालयांमध्ये एक हजार 81 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
 • रुग्णांच्या संपर्कातील 277 व्यक्‍तींचे अहवाल प्रलंबित; सोलापुकरांची वाढली चिंता 
 • आज (शुक्रवारी) चौघांचा मृत्यू; मृतांची संख्या आता 296 
 • लक्ष्मी पेठेतील बल्लारी चाळ, धाकटा राजवाडा, स्वामी विवेकानंद नगर आणि समाधान नगरातील प्रत्येकी एकाचा मृत्यू 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four people died today Coronavirus infection in 49 persons