या चौदा गावांची धडकी वाढली 

 Fourteen villages in the Ankle area were in fear of corona
Fourteen villages in the Ankle area were in fear of corona

डफळापुर : अंकले  (जि  सांगली) गावात मुंबईहून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर अंकले परिसरातील चौदा गावांची धडकी वाढली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात बाहेरून हजारो जण डफळापूर परिसरात आले असून परदेशातून आलेली ही एक व्यक्ती आहे. यामुळे जत तालुक्‍यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा रेडमधून ऑरेंज झोनमध्ये आल्यानंतर परराज्यातील व मुंबई-पुणे इतर जिल्ह्यातून लोकांना आपल्या गावी जाण्यासाठी वाव मिळाला. हजारो नागरिक परत डफळापूर परिसरात असणाऱ्या 14 गावांमध्ये व वाडीवस्तीवर परतले आहेत. डफळापूर परिसरातील अनेक जण नोकरी व व्यवसायानिमित्त पूर्ण राज्यात विखुरले गेले आहेत. लॉकडॉनमुळे प्रत्येक जण सध्या आपापल्या गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. डफळापूर गाव हे कर्नाटक लगत असल्याने अनेक ठिकाणांहून मार्ग असून येथून बऱ्याच जणांचा जाणे व येण्यासाठी मार्ग आहेत. 

कारोना पेशंट सापडल्याने सध्या अंकले गावाची काळजी वाढली असून बाहेरून येणाऱ्यांमुळे धोका वाढला आहे. अंकले गावाची लोकसंख्या 3103 आहे. व घरांची संख्या 750 आहे. मुंबईमध्ये अंकले या ग्रामीण भागातून सर्वात जास्त पाचशेच्या वरती कामानिमित्त व व्यवसायासाठी आहेत. आत्तापर्यंत मुंबईहून आलेल्या नागरिकांची संख्या 380 च्या वरती आहे. 

अंकले कंटेनमेंट झोन 
अंकले गाव कंटेनमेंट झोन मध्ये ठेवले आहे. त्यामुळे डफळापूर- अंकले. बाज- अंकले. ढालगाव- अंकले. बसाप्पाचीवडी- अंकले. हिवरे- अंकले हे मार्ग अंकल्यापासून दोन किलोमीटर वरती बारकेट लावून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. व त्यांच्यासोबत चोवीस प्राथमिक शिक्षकांना पाचारण केले आहे. गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गावातील सर्व दूध डेरीसह व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. 

नागरिकांनी सहकार्य करावे

ग्रामस्थांनी घाबरू नये बाहेरून येणाऱ्यांनी संबंधित प्रशासनास माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी. प्रशासनास जत तालुक्‍यातील नागरिकांनी सहकार्य करावे. कोणी माहिती लपवल्यास व विनाकारण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल.

- सचिन पाटील, तहसीलदार

संशयास्पद आढळल्यास मिरज रुग्णालयात

डफळापूर आरोग्य वर्धनी केंद्रांतर्गत 14 गावे येतात. या गावांमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच स्वतःसह आमचे पथक त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली जाते. त्यात संशयास्पद आढळल्यास पुढे मिरज शासकीय. रुग्णालयात पाठविले जाते. 
- डॉ. अभिजित चौथे, वैद्यकीय अधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com