सफारी गाडीच्या आमिषाने तरुणाला घातला पावणे तीन लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

आपणास सफारी गाडी लकी ड्रॉमध्ये लागली असल्याचे सांगत केली फसवणूक 

मिरज (सांगली) : कळंबी (ता. मिरज) गावात एका तरुणाची कर्ज मिळवून देण्यासह आपणास लकी ड्रॉ मध्ये सफारी गाडी लागली आहे असे सांगून तब्बल २ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. सूरज मुजावर (वय २५) फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची नावे अमितकुमार अग्निहोत्री आणि मनिषकुमार अशी आहेत. नेहमीप्रमाणे दोघांचे पत्ते फिर्यादी मुजावर यांना माहीत नाहीत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज मुजावर यांना फसवणूक करणाऱ्या दोघांनी कर्ज मिळवणून देण्याचे आमिष दाखविले त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम ऑनलाईन पद्धतीने उकळली आणि त्यानंतर झुलवत ठेवून मुजावर यांना आपणास सफारी गाडी लकी ड्रॉमध्ये लागली असल्याचे सांगत त्यासाठीही जी. एस. टी आणि अन्य सोपास्कार पूर्ण करण्यासाठी काही रक्कम ऑनलाईन पद्धतीने वसूल केली. मुजावर यांच्याकडून २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर फसवणूक करणाऱ्या दोघांचेही नंबर स्विच ऑफ झाले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मुजावर यांनी मिरज पोलिसात तक्रार दिली. 

हेही वाचा - शेतकरी नवरा नको गं बाई मला ? शेतकऱ्याच्या लग्नाची सोशल मिडीयावर चर्चा -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud with one youth in sangli with lucky draw and rupees 3 lakh fraud case

Tags
टॉपिकस
Topic Tags: