esakal | स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील यांचे निधन

सांगली -  स्वातंत्र्यसेनानी व जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे
माजी अध्यक्ष बापूसाहेब अण्णासाहेब पाटील (वय 99) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

स्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब पाटील यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली -  स्वातंत्र्यसेनानी व जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे
माजी अध्यक्ष बापूसाहेब अण्णासाहेब पाटील (वय 99) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.

बापूसाहेब पाटील यांचे मूळ गाव ब्रह्मनाळ (ता. पलूस) आहे. वयाच्या 17 व्या वर्षी ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. स्व. वसंतदादा पाटील आणि तत्कालीन क्रांतिकारकांबरोबर ते स्वातंत्र्य चळवळीत अग्रस्थानी होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरूंगवासही भोगला. स्वातंत्र्यानंतरही ते सामाजिक चळवळीत अग्रभागी राहिले. जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. वाहतूकदारांचे लढवय्ये नेते म्हणून परिचित होते. राज्य ट्रक-टेम्पो-टॅंकर्स बस वाहतूक महासंघाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून राज्यात नेतृत्व केले. जिल्हा वाहनधारक व ट्रान्स्पोर्ट एजंट नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. अलिकडच्या काळात अनेक आंदोलनात ते सक्रीय सहभागी होते.

आज दुपारी अडीचच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. निधनानंतर सायंकाळी त्यांचे पार्थिव कॉंग्रेस भवन आणि वखारभागातील बाहुबली ट्रान्स्पोर्ट येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले. 

loading image
go to top