स्वातंत्र्यसैनिकांना उद्या अभिवादन - रघुनाथदादा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

इस्लामपूर - गोऱ्या इंग्रजांनी गोळ्या घातलेल्या व फाशी दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना व काळ्या इंग्रजांनी फाशी घ्यायला भाग पाडलेल्या शेतकरी, शेतमजूर, स्त्री-पुरुष शहिदांना अभिवादन मेळावा गुरुवारी (ता. २३) येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विविध संघटनांचे नेते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार बच्चू कडू प्रमुख पाहुणे आहेत.

पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जातून मुक्‍त करा, केंद्र सरकारने अकुशल स्त्री-पुरुष मजुरांना जाहीर केलेले ३५० रुपये व सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्‍के नफा, असा हमीभाव मिळालाच पाहिजे, साखर बगॅस व मोलॅसिसचे वाढलेले भाव लक्षात घेता गत गळीत हंगामात उसाला प्रतिटन एक हजार रुपये जादा मिळाले पाहिजेत व दिव्यांगाना शासनाने जाहीर केलेल्या सवलती व सोयीसुविधा तातडीने द्याव्यात, या प्रमुख मागण्या घेऊन शहिदांना अभिवादन मेळावा आयोजित केला आहे. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मात्र त्यांनी आश्वासने पाळलेली नाहीत. जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत असणाऱ्या पिकांचा उत्पादन खर्च सरकारला माहीत आहे. कृषिमूल्य आयोगानेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘साखर कारखानदारांनी एफआरपी दिली यावर आम्ही समाधानी नाही, त्यांनीही बढाया मारू नयेत. त्यांनी मेहेरबानी केलेली नाही. उपपदार्थांच्या वाढलेल्या किमतीतून त्यांना जो नफा मिळाला आहे तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. उद्योजकांना एक आणि शेतकऱ्यांना दुसरी अशी वागणूक का दिली जाते. निर्यातबंदी उठवली पाहिजे. दोघांना समान न्याय देण्याची सरकारची भूमिका पाहिजे.’’ धनपाल माळी, शंकरराव मोहिते, हणमंतराव पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: freedom fighter tomorrow remembrance