खरसुंडीत आठ महिन्यांनंतर शुक्रवारची नमाज मशिदीत

हमीद शेख
Saturday, 21 November 2020

शासनाने प्रार्थनास्थळे खुली केल्याने आटपाडी तालुक्‍यात आठ 
महिन्यानंतर मशिदीत शुक्रवारची नमाज नियमांचे पालन करीतात झाली. 

खरसुंडी (जि. सांगली ) ः शासनाने प्रार्थनास्थळे खुली केल्याने आटपाडी तालुक्‍यात आठ 
महिन्यानंतर मशिदीत शुक्रवारची नमाज नियमांचे पालन करीतात झाली. 

मार्च महिन्यापासून आठ महिने कोरोना महामारीमुळे शासनाने सर्वच मंदिरे प्रार्थनास्थळे बंद ठेवली. आदेशाचे सर्वांकडून स्वागत झाले. प्रार्थना स्थळे बंद असल्यामुळे मुस्लिम बांधव घरातच नमाज पठण करीत होते. 

आठ महिन्यात शुक्रवार व ईदची नमाज पठण करण्यास अडचणी आल्या. मशिदी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. 16 नोव्हेंबरपासून शासनाने सर्वच राज्यातील मंदिरे प्रार्थनास्थळे खुली केली. त्याचेही मुस्लिम बांधवांनी स्वागत केले. शासनाने परवानगी देताच मुस्लिम बांधवांनी मशिदीची स्वच्छता करून नमाज पठण करण्यास सुरवात केली. 

आटपाडी तालुक्‍यात दिघंची, करगणी, आटपाडी, धावडवाडी, निंबवडे, घरनिकी, नेलकरंजी, खरसुंडी, पिंपरी बुद्रुक, जांभुळणी गावांत नमाज पठणासाठी मशिदी उभारल्या आहेत. मार्चपासून सर्व मशिदी कुलूप बंद होत्या. शासनाने आदेश दिल्यानंतर आज नमाज पठण मशिदींत नियमांचे पालन करीत करण्यात आले. महामारी संपत नाही तोपर्यंत नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friday prayers at the mosque after eight months in Kharsundi