
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून, बारा तासांत पुन्हा एक घटना घडली आहे. बुधगाव (ता. मिरज) येथील झेंडा चौकात सकाळी साडेआठच्या सुमारास मित्राचा चाकूने भोसकून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सिकंदर मौला शिकलगार (वय ५२, बुधगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संशयित मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी (वय ५९, रा. वनवासवाडी, बुधगाव) याला ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
बुधवारी (ता. २) रात्रीही देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे पूर्वीच्याच वादातून खून झाला. आजही (ता.३) याच शुल्लक कारणातून हा प्रकार घडला. पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत.