स्वाभिमानीने फाडले  प्रतिकात्मक बील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

केंद्र सरकारने लोकसभेत चर्चा न घडवता, विश्‍वासात न घेताना कृषी बील मंजूर केल्याच्या निषेर्धात आज देशभर डाव्या चळवळी, डावे पक्ष, शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी विरोध आंदोलन केले. कृषी बिलाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी नेतृत्व केले. 

सांगली ः केंद्र सरकारने लोकसभेत चर्चा न घडवता, विश्‍वासात न घेताना कृषी बील मंजूर केल्याच्या निषेर्धात आज देशभर डाव्या चळवळी, डावे पक्ष, शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी विरोध आंदोलन केले. कृषी बिलाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी नेतृत्व केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिलामध्ये काही शंका उपस्थित करत त्याला विरोध केला आहे. श्री. खराडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिलाचे प्रतिकात्मक कागद फाडून हवेत फिरकावले आणि केंद्र शासनाच्या "हम करे सो कायदा' धोरणाचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की केंद्र सरकारने नुकतीच संसदेत तीन कृषी विधेयके पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करून शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचा विडा उचलला आहे. शेतकरी हितापेक्षा व्यापारी आणि उद्योगपतीना फायदा होण्याच्या दृष्टीने ही बिले आहेत. शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ढकलले आहे. एमएसपी रद्द करून सर्वच सौरक्षण काढून घेतले आहे.

करार शेतीच्या माध्यमातून उद्योगपतीना खुली सुट आणि शेतकऱ्यांना मजूर बनविणारे धोरण आखले जात आहे. या विधेयकपेक्षा कमी व्याज दराने पीक, मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा, हमी भाव, साठवणीसाठी वेयर हाऊस, कोल्ड स्टोअरेज, प्रेकॉलींग युनिट उभारले असते तर स्वागत केले असते.' यावेळी भरत चौगुले, श्रीधर उदगावे, बाळासाहेब लिंबेकाई, सुरेश पचिब्रे, मारुती देवकर, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in front of the Collector's Office, tearing up symbolic bills by swabhimani