दिघंचीत बाजार पेठेत  सोशल डिस्टन्सिगचा फज्जा 

download (1).jpg
download (1).jpg

दिघांची (सांगली) ः वीस हजार लोकसंख्या असलेल्या दिघंची गावच्या व्यापारी पेठेत व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सीचा फज्जा उडाला आहे. मास्क मुक्तीकडे वाटचाल सुरू असून नाकावरचा मास्क हनुवटीवर आला तर काहींनी परिसर कोरोना मुक्त झाल्यासारखा मास्क वापरने बंद केले आहे. शेजारील जिल्ह्यातील ग्रामस्तानचा प्रवेशाने गावामध्ये कोरोनाच्या भीतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

आटपाडी तालुक्‍यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अद्याप जरी दिघांची परिसर कोरोना पासून अलिप्त ठेवण्यात यश आले असले तरी कोरोना बांधावर येऊन ठेपला आहे. शेजारी सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरामध्ये कोरोनाचा आलेख वाढल्याने तेथील व्यपारी पेठ बंद ठेवण्यात आली असल्याने वरकुटे - मलवडी, महाबळेश्वरवाडी, देवापुर पळसावडे, शेणवडी आदी तर सोलापूर जिल्ह्यातील कटफळ, लोटेवडी, खवसपूर, शिंगोर्नि, ईटकी आदी गावातील ग्रामस्तानची गर्दी येथील व्यपरपेठेत मोठ्या प्रमाणात आहे. 

युवा नेते शहाजी यादव म्हणाले कोरोना सरहद्दीवर पोहचला आहे. नागरिक गांभीर्याने घेत नाहीत. शेजारील रेड झोन असणाऱ्या सातारा व सोलापूर मधून येणाऱ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये भाजी मंडई त्याचबरोबर कापड दुकान ,किराणा दुकान, मोबाइल शॉपी, व अन्य दुकाने याचं ठिकाणी असल्याने येथील परिसर गर्दीने फुलून गेला आहे.ग्राहकाबरोब आता विक्रीदाराने सुद्धा मास्क वापरणे बंद केले आहे.दरम्यान दक्षता कमिटीने पोलिसांना फोन करून देखील पोलिस याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे यावेळी दक्षता कमिटी अध्यक्ष यांनी सांगितले. 
-------------------- 
कोट 

येथील व्यापारी पेठेत गर्दी वाढू लागली आहे. शेजारील जिल्ह्यातील नागरिकांचा विनामास्क वावर वाढल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन विना मस्कधारकाना रुपये पाचशे चा दंड करणार 

अमोल मोरे, सरपंच 

कोट 
व्यापारी पेठेतील गर्दीला आळा घालण्यासाठी सावंता पुसावळे हॉटेल व राजेवाडी चौक या ठिकाणी बांबू बांधून चार चाकी व मोटरसायकल ला प्रवेशबंदी करावी तोंडाला मास्क असणाऱ्यांनाच पेठेत प्रवेश दयावा 

शैलेंद्र गोंजारी 
ग्रामस्थ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com