बिहारमधून विशेष रेल्वेतून निघाले गलाई बांधव...मंगळवारी सांगलीत पोहोचणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

लेंगरे (सांगली)-  बिहार राज्यासह पटना येथील गलाई व्यावसायिकांचा आमदार अनिल बाबर,महाराष्ट्र मंडळ पटना यांंच्या प्रयत्नामुळे गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बिहार मध्ये अडकलेल्या लोकांना विशेष रेल्वेने सांगली येथे सोडण्यात आली आहे.बिहार पटना येथून (ता.24) रोजी सुटलेली ही रेल्वे (ता.26) रोजी सांगलीत पोहचणार असल्याची माहिती पटना येथील महाराष्ट्र मंडळाचे सचिव संजय भोसले यांनी दै.सकाळ शी बोलताना दिली.

श्री.भोसले म्हणाले,कोरोनाच्या लाँकडाऊनमुळे बिहार,उत्तर प्रदेश मधील गलाई व्यावसायिक व्यवसाय नसल्याने हतबल झाले होते.लाँकडाऊनमुळे गावी जाण्यासाठी कोणत्याही सोई नव्हत्या त्यामुळे व्यावसायिक चांगलेच मेटाकुटीला आले होते.मात्र या दोन राज्यात सरकारी सेवेत कार्यरत असणार्या मराठमोळ्या अधिकार्यानी आमची गावी जाण्यासाठीची घालमेल पाहून त्यांच्या मदतीसाठी धावले.

पटना महाराष्ट्र मंडळाने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे मराठी लोकांना विशेष रेल्वे सांगली येथे सोडण्याची मागणी केली होती.यावेळी येथील मराठी अधिकार्याच्या मदतीने परवानगी देण्यात आली.परंतु महाराष्ट्रात जाण्याची परवानगी गरज होती.यावेळी आमदार अनिल बाबर यांच्यांशी संपर्क साधून जिल्हाधिकार्याकडून परवानगी मिळवून देण्यासंर्दभात चर्चा करण्यात केली.अशावेळी आमदार बाबर यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची परवानगी मिळवून दिल्याने गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बांधवाना घेऊन ही विशेष रेल्वे (ता.24) रोजी सुटली असून (ता.26) रोजी सांगली येथे पोहचणार असून या ठिकाणी सर्व लोकांचे थर्मल स्क्रीनिंग करुन प्रशासनाकडून त्यांना आवश्यकतेनुसार होम अथवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठी बांधवाना घरी नेण्यासाठी महाराष्ट्र मंडळ पटनाचे अध्यक्ष विजय पाटील,शंकर किर्दत,आनंदराव पवार,प्रदीप पाटील,राजेंद्र मोरे,आधीक मोरे,मल्लिकार्जुन आरळे,सुनिल शिंदे,सुरेश आरळे,सदाशिव गायकवाड, विठ्ठल घोडके,संतोष पवार,संतोष देवकर,देवेंद्र शेड्याळ,विजय बाबर,प्रदीप पाटील यांनी पाठपुरावा केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Galai brothers left Bihar by special train. will reach Sangli on Tuesday