Sangli : माधवनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
संजयनगर पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकला. रोख १०६० रुपये, ५० हजार रुपयांचे सहा मोबाईल, एक लाख ३५ हजार रुपयांच्या तीन दुचाकी असा १ लाख ८६ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला.
Police display seized cash and gambling material after raid on illegal den in Madhavnagar.Sakal
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील रविवार पेठेत बंद गोदामात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर संजयनगर पोलिसांनी छापा टाकला. आठजणांवर कारवाई करत १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.