esakal | दरोड्याच्या तयारीतील चौघांची टोळी पकडली 
sakal

बोलून बातमी शोधा

A gang of four arrested in the robbery

झडतीत त्यांच्याकडून मोटरसायकल, धारदार शस्त्र, मोबाईल, असा एकूण 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी नेवासे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली.

दरोड्याच्या तयारीतील चौघांची टोळी पकडली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : शेवगाव-नेवासे रस्त्यावर नागापूर शिवारात दरोड्याच्या तयारीतील चौघांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून पकडली.

त्यांच्याकडून मोटरसायकल, धारदार शस्त्रे, मोबाईल, असा एकूण 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवराज कृष्णप्पा खडमंची (वय 19), मारुती शिवकुमार खडमंची (वय 19), रवी आनंद खडमंची (वय 35) व नागराज देवराज खडमंची (वय 19, सर्व रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. 


गुलबर्गा (कर्नाटक) येथील सराईत गुन्हेगारांची टोळी नेवासे-शेवगाव रस्त्याने दरोड्याच्या तयारीने येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने शेवगाव-नेवासे रस्त्यावर नागापूर शिवारात वनीकरणाच्या कमानीजवळ सापळा लावला.

जाणून घ्या - तिचं बाळ कुत्र्याने पळवलं

त्या वेळी दोन दुचाकी शेवगावहून नेवासे फाट्याकडे येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला तेव्हा त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. पथकाने त्यांना घेराव घातला. 


झडतीत त्यांच्याकडून मोटरसायकल, धारदार शस्त्र, मोबाईल, असा एकूण 22 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी नेवासे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली. कॉन्स्टेबल संदीप चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक शशीकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, रवी सोनटक्के, अण्णा पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

loading image