अभिषेकने सौंदत्ती यल्लम्माला जाऊन परत येऊया, अशी गळ घातली. अभिषेक याने आदिलशहा जमादार याला सोबत घेतले. या दोघांनी एक मोटार घेतली. त्यात चालक म्हणून कौतुक होता. मुलीवर अभिषेकने व आदिलशहाने अत्याचार केले.
रायबाग : सोशल मीडियावरून ओळख वाढवून दोन अल्पवयीन मुलींवर तिघांनी सामूहिक अत्याचार (Gang Rape of Girls) केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना हारुगेरी पोलिसांनी (Harugeri Police) अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.