
सांगली : पहिले लग्न झालेले असताना एका विवाहितेने चौघांच्या मदतीने वरास दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यासाठी संशयित महिलेने लग्नासाठी स्वतःचे नावही बदलल्याचे समोर आले. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी संशयित महिलेसह चौघांना गजाआड केले.