सांगली : सह्याद्रीनगर (Sahyadri Nagar) परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंडावर धारदार हत्याराने हल्ला (Sangli Crime) करून दगडाने ठेचण्यात आले. त्यात डोक्यात वर्मी घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुबारक ऊर्फ पुलवा हसीउल्ला साहा (वय ३७, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली.