
सांगली : महापालिकेच्या मिनी कंटेनर कम घंटागाड्या चालवणारे कंत्राटी चालक अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. सात हजार रूपये मानधनातून फंड कपात होऊन हाती अवघे 5 हजार 895 रूपये येतात. तेवढ्यात त्यांचा संसार चालणे मुश्किल आहे. तशातच सायंकाळच्या शिफ्टमध्येही त्यांना बोलावले जाते. त्यामुळे पार्टटाईम नोकरीचा मार्गही महापालिका प्रशासनाने बंद केला. त्यामुळे कंत्राटी चालकांची ससेहोलपट सुरू आहे.
महापालिका क्षेत्रात यापूर्वी हाताने ढकलत न्यायच्या घंटागाडीतून कचरा संकलित केला जात असे. घंटा वाजली, की नागरिक पळत येऊन कचरा टाकत. परंतू ढकल घंटागाडीची क्षमता कमी असल्यामुळे तसेच घंटागाडी एकदा भरल्यानंतर दूरवर कंटेनरमध्ये कचरा टाकून परत येण्यास विलंब लागत असे. अनेक घंटागाडी चालक गल्लीत आठवड्यातूनच दिसायचे. त्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर तसेच गटारीत टाकत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी सव्वा वर्षापूर्वी अद्यावत घंटागाडी कम मिनी कंटेनर येथे आणण्यात आले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात 40 घंटागाड्यातून कचरा संकलित केला जाऊ लागला. छोट्या टेम्पोच्या मागे हौद बनवून त्यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो संकलित केला जातो.
घंटागाडीत पूर्वी घंटा वाजवला जात होता. परंतू नव्या गाड्यातील स्पीकरवरून पुकारून नागरिकांना कचरा टाकण्यास आवाहन केले जाते. हौद्यामध्ये भरपूर जागा असल्यामुळे एकावेळी दोन-तीन गल्ल्यातील कचरा संकलित होत आहे. तसेच वेळेत कचरा कंटेनरमधून टाकून परत येता येते. महापालिका क्षेत्रात अनेक प्रभागात अतिशय चांगल्याप्रकारे नव्या गाड्यातून कचरा संकलित होत आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीचे प्रमाणही कमी झाले आहे.
"स्वच्छ सांगली-सुंदर सांगली' करण्यासाठी नव्या घंटागाड्या पळत आहेत. त्यासाठी कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत. त्यांच्या नियुक्तीचे करार करण्यात आले आहेत. सात हजार रूपये अशा तुटपुंज्या मानधनावर चालक नियुक्त आहेत. मानधनातून फंडाची रक्कम कपात होता हातात अवघे 5 हजार 895 रूपये शिल्लक राहतात. महागाईच्या काळात त्यामध्ये संसार चालवणे मुश्किलच आहे. सुरवातीला या चालकांना सकाळी सहा ते दुपारी दोन अशी कचरा संकलित करण्याची वेळ होती. त्यामुळे दुपारनंतर अनेक चालक रिक्षा चालवणे किंवा अन्यत्र छोटी कामे करून उदरनिर्वाह करत होती. परंतू काही दिवसांपासून त्यांच्या ड्युटीमध्ये बदल केला आहे.
काळी सात ते दुपारी एकपर्यंत काम करावे लागते. त्यानंतर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पेठांमधील कचरा संकलित करण्यास बोलवले जाते. त्यामुळे पार्टटाईम काम करणे शक्य नाही. महापालिकेसाठी दिवसभर घालवून हातात केवळ सहा हजार रूपयेच पडतात. एक वर्षाचा करार संपला तरी अद्याप नवीन करार केला नाही. मानधन वाढवले जावे अशी मागणी आहे.
तुटपुंज्या मानधनात काम करणे शक्य नाही.
कचरा संकलित करण्यासाठी प्रामाणिकपणे घंटागाडी चालवतो. पुरेशी सुरक्षा साधने नसतात. तरीही काम करतो. तुटपुंज्या मानधनात काम करणे शक्य नाही. कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच काम करतो. त्या तुलनेत मानधन मिळावे.
- एक त्रस्त चालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.