महापौर-राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील बागेच्या कुंपणाला भगदाड 

अजित कुलकर्णी
Wednesday, 28 October 2020

सांगली-  महापौर आणि राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील त्रिकोणी बागेच्या कुंपणाला गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे. लोकप्रतिनिधींच्या डोळ्यासमोर ही अवस्था शहरातील एकूणच समस्यांचे प्रातिनिधिक चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे भगदाड कायम आहे. 

सांगली-  महापौर आणि राज्यमंत्र्यांच्या घरासमोरील त्रिकोणी बागेच्या कुंपणाला गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडले आहे. लोकप्रतिनिधींच्या डोळ्यासमोर ही अवस्था शहरातील एकूणच समस्यांचे प्रातिनिधिक चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे भगदाड कायम आहे. 

नेहमी वाहने तसेच माणसांच्या गर्दीने भरुन जाणाऱ्या डॉ.आंबेडकर रस्त्यावरील त्रिकोणी बाग आहे. या उद्यानाला उद्यानप्रेमी नगराध्यक्ष डॉ. जी.ए.देशपांडे यांचे नाव आहे. बागेला मुख्य रस्ता उत्तर दिशेकडून असला तरी अनेक छोटी प्रवेशद्वारे आहेत. त्याच्या देखभाल व व्यवस्थापनाबाबत हलगर्जीपणा दिसून येतो. बागेचे कुंपण नगरपालिका असताना उभारले आहे. मात्र बांधकामाचा दर्जा सुमार असल्याने कुंपणाची पडझड सतत सुरु असते.

मुख्य प्रवेशव्दारासमोरच जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तर दक्षिणेला रस्त्याला खेटून राज्यमंत्री विश्‍वजीत कदम व महापौर गीता सुतार यांचे निवासस्थान आहे. मात्र बागेच्या कुंपणाची होणारी ही पडझड लक्षात कोण घेतो? अशी स्थिती आहे. गेल्या दोन वर्षांपासून बागेच्या दक्षिणेकडील रस्त्याला असलेले कुंपण जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे भटकी जनावरे, कुत्र्यांचा बागेत वाढत आहे. कुंपणाला खेटूनच सायंकाळी खाद्यपदार्थांचे गाडे लागलेले असतात. तेथे येणारे खवैय्ये बसण्यासाठी या पडझड झालेल्या कुंपणाचा आधार घेत असल्याचे चित्र आहे. मद्यपी, नशेबाजांचा वावर तर रोजचाच आहे. बागेच्या कुंपणाची ही दुरवस्था दूर करण्याची मागणी होत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The garden fence in front of the mayor-minister's house was breached