Miraj truck accidentSakal
पश्चिम महाराष्ट्र
Miraj Accident : मिरजेत ट्रकने पाच दुचाकींना उडवले: तिघेजण जखमी, गॅस सिलिंडर भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले
चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकींना एका पाठोपाठ ठोकरत तो गेला. यात दुचाकींचा चक्काचूर होत दुचाकीचालक गंभीर जखमी झाले. संतप्त जमावाने ट्रकचालकाला थांबवत त्याला चोप देत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिरज : शहरातील शास्त्री चौक परिसरात गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकने पाच दुचाकींना उडवले. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. युनूस बासू मुजावर (वय ४०, रा. खंडोबाची वाडी, शिंदे मळा, ता. पलूस) असे संशयित ट्रकचालकाचे नाव आहे. तर, अलिशा अल्तमीज मुल्ला, अखिल अस्लम मोमीन आणि इकबाल मिरासाहेब मणेर अशी जखमींची नावे आहेत. मिरज शहर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

