सांगली महापालिकेच्या महासभेत वादग्रस्त विषय मंजुरीचा घाट, उद्या सभा

 Gateway for approval of controversial subject in Sangli Municipal General Assembly, meeting tomorrow
Gateway for approval of controversial subject in Sangli Municipal General Assembly, meeting tomorrow

सांगली : महापालिकेच्या सोमवारी (ता. 20) होणाऱ्या महासभेत एक (ज) खाली पुरवणी विषयपत्रात कोट्यवधी रुपयांचे धोरणात्मक विषय घेण्यात आले आहेत. हे विषय वादग्रस्त असून, चर्चेचे गुऱ्हाळ ठेवून ते घाईगडबडीत मंजुरीचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने या विषयांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहेत. त्यामुळे महासभेत घमासान होण्याची चिन्हे आहेत. 

सोमवारच्या महासभेच्या मूळ विषयपत्रावर चौक नामकरणासारखे किरकोळ विषय घेतले आहेत. मात्र एक (ज) खाली महत्त्वपूर्ण असे अडचणीचे विषय आणले आहेत. निर्णयानुसार 2006 मध्ये "ड' वर्ग महापालिकेसाठी अतिरिक्त आयुक्त व इतर अधिकाऱ्यांची मागणी ही रीतसर आकृतीबंधानुसार करावी लागते. विषयपत्रानुसार महासभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे.

मात्र, हा विषय एक (ज) खाली आणला असून, यात काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा घाट आहे; तर उद्यानाचे आरक्षण उठवून रहिवास भागात समाविष्ट करण्याचाही विषय यात आहे. यापूर्वी महासभेत मंजूर काही ठरावात बदल करण्याचाही विषय एक (ज) खाली आणला आहे. 

सांगलीप्रमाणेच मिरजेचीही भुयारी गटार योजना (ड्रेनेज) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यांना सल्लागार म्हणून महापालिकेकडून मोबदला दिला जातो. तरीही पुन्हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जीवन प्राधिकरणास नेमणुकीचा विषय ठेवला. वखार भाग येथे ट्रक पार्किंगसाठी जागा आरक्षित आहे. तेथे मल शुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचा विषय असाच घाईगडबडीत ठेवण्यात आला. 

वास्तविक एक (ज) खालील विषयांना कोणतीही कार्यालयीन टिप्पणी, विषयपत्र नसते. प्रशासकीय मान्यताही नसते. एकूणच मूळ विषयपत्रावर 20 आणि पुरवणी विषयपत्रात असे वादगस्त 20 असे सुमारे 40 विषय ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे एक (ज)चे मागच्या दाराने विषय आणून चर्चेविना हे वादग्रस्त विषय मंजूर करून कोट्यवधींचा गैरकारभार करण्याचा घाट घालण्यात आला. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या महासभेत विरोधक राष्ट्रवादी-कॉंग्रेसने याचा पंचनामा करून पर्दाफाश करण्याची तयारी केली आहे. 

भाजपने भ्रष्ट कारभाराचा पंचनामा करीत महापालिकेची सत्ता काबीज केली. त्यांनी पारदर्शी कारभाराची ग्वाही दिली होती. आयत्यावेळेत, घाईगडबडीत सभा गुंडाळून विषय मंजूर करणार नाही, अशी आश्वासने दिली होती. परंतु, कारभारात काही फरक पडलेला नाही. 

"त्या' आजींची फसवणूक 
महापौर संगीता खोत यांनी आयर्विन पुलाच्या बांधकामात योगदान देणाऱ्या लक्ष्मीबाई पुजारी या 106 वर्षांच्या आजींना घर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. प्रशासनाने संजयनगर पत्राचाळ येथील घरकुल योजनेत त्यांना घरकुल देण्याचा विषय महासभेसमोर ठेवला. याबाबत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, की झोपडपट्टीमुक्त घरकुल योजनेंतर्गत हे संकुल बांधले आहे. याच्या आराखड्यात मूळ जागेवरील 59 जणांचा समावेश आहे. मात्र, तेथे 54 घरकुले बांधली आहेत. त्यातच वडर कॉलनीतील सहा जणांनाही येथे घरे देण्याचा निर्णय झाला. योजनेत आजीबाईंचे नाव नाही. आहे त्यांच्यातच वाद असताना तेथे घरकुल देण्याचे आश्‍वासन ही निव्वळ फसवणूक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com