सांगली जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा यंदा "ऑनलाईन' होणार

The general meeting of Sangli District Bank will be held online this year
The general meeting of Sangli District Bank will be held online this year

सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची यंदाची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार आयुक्तांच्या सूचनेनुसार ऑनलाईन घेतली जाणार आहे. बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता बॅंकेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात ती घेतली जाईल. सभासदांना कामकाजात सहभागी होण्यासाठी मोबाईलवर "लिंक' पाठवली जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्हा बॅंकेची 93 वी सभा बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीतील वसंतरावदादा पाटील सभागृहात होणार असल्याची नोटीस यापूर्वी सभासदांना पाठवण्यात आली होती. प्रतिवर्षाप्रमाणे ही सभा होणार असल्यामुळे सभासद व सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याची सूचना केली होती. परंतू या नोटीसीनंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास शासनाने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बॅंक प्रशासनाने सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधकांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाच्या निर्बंधामुळे गेल्या काही दिवसापासून बॅंकांच्या सभा ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. आता जिल्हा बॅंकेची सभा देखील दृकश्राव्य (व्हीसी) आणि दृश्‍य संवाद (ओएव्हीएम) द्‌वारे ठरलेल्या दिवशीच म्हणजे बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता होईल. ऑनलाईन सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभासदांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर स्वतंत्र "लिंक' पाठवण्यात येणार आहे. 

सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभासदांनी बॅंकेच्या शाखेमध्ये संपर्क साधून मोबाईल क्रमांक, ई-मेल, व्हॉटस्‌ ऍप सुविधा असलेला मोबाईल क्रमांकाची नोंद 6 मार्च 2021 पर्यंत करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी केले आहे.

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com