खासगी डॉक्‍टर्स, हॉस्पिटल्सची मदत घ्या...विभागीय आयुक्त सौरभ राव

विष्णू मोहिते
Wednesday, 2 September 2020

सांगली- वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी डॉक्‍टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे नकार देतील, अशी हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. 

सांगली- वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खासगी डॉक्‍टर्स आणि हॉस्पिटल्सची मदत घ्यावी. जे नकार देतील, अशी हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत, असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. राव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. 

ते म्हणाले,""कोरोना उपाय योजना संदर्भात निधीची कमतरता नाही. आवश्‍यक तो निधी प्रशासनाकडे लवकरच सुपुर्द करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुल येथे 110 तर शासकीय महाविद्यालय (मिरज) येथे 50 बेड्‌सचे डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यानंतर रूग्णांची सोय होईल. जिल्हा प्रशासनाने आढावा घेण्यासाठी विविध हॉस्पीटल्स मॅनेजमेंटशी झुम ऍपव्दारे संवाद साधावा. कोरोनाची स्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव असणाऱ्या खासगी, निवृत्त डॉक्‍टरांची सेवा घ्यावी. रूग्णालयात उपलब्ध बेड मॅनेजमेंटचाही आढावा रोज घ्यावा.'' 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले,""50 वर्षापुढील कोमॉर्बिडिटी असलेल्या व्यक्तींची ऍन्टीजन टेस्टला प्राधान्य देण्यात येत आहे. बाधितांपैकी 60 टक्के रूग्ण बरे झालेत. 36 टक्के रूग्ण उपचाराधिन आहेत. जिल्हा प्रशासनाकडे लवकरच 30 व्हेंटीलेटर उपलब्ध होतील. आयुक्तांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात येणाऱ्या 110 बेडच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पाहणी केली. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, विवेक आगवणे, बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get help from private doctors, hospitals : Divisional Commissioner Saurabh Rao