ब्रह्मनाळचा घाट उतरणार कॅनव्हासवर; नामवंत चित्रकार चितारणार सौंदर्य

The ghat of Brahmanal will descend on the canvas; Beauty painted by a renowned painter
The ghat of Brahmanal will descend on the canvas; Beauty painted by a renowned painter

माधवनगर (जि. सांगली) : ज्या घाटानं महापुरात मृत्यूचं तांडव बघितलं, तोच ब्रह्मनाळचा घाट किती सुंदर आहे, हिरवागार आहे, कलात्मक आणि बांधकामाचा अत्युच्च नमुना आहे ते राज्यातील रसिकांना दिसणार आहे. निमित्त आहे एक अनोख्या कार्यशाळेचं. पश्‍चिम महाराष्ट्रातील 30 हूनही जास्त नामवंत चित्रकार 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी या आनंदमूर्ती घाटावर एकत्र येणार असून ते या घाटाच्या सौंदर्याला कॅनव्हासवर उतरवणार आहेत. 

ब्रह्मनाळ आणि या गावचा नदीकाठ म्हणजे निसर्गाचा मुक्त आविष्कार. हिरवाईची चादर ओढून निवांत बसलेला हा काठ भल्याभल्यांना भुरळ घातल्याशिवाय रहात नाही. वर्दळीपासून दूर असलेला इथला आनंदमूर्ती घाट तर प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अद्‌भूत नमुना.

आता हाच घाट आणि काठ, इथला निसर्ग कॅनव्हासवर चितारण्याचा प्रयत्न राज्यभरातील नामांकित आणि नवोदित चित्रकार करणार आहेत. निमित्त आहे आनंदमूर्ती स्वामी संस्थेच्यावतीनं आयोजित दोन दिवसीय निसर्गचित्र कार्यशाळेचं. 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी ही कार्यशाळा या घाटावर भरते आहे. 

सांगलीत खूप दिवसांपासून चित्रकला, शिल्पकला याबाबतची एकही ऍक्‍टिव्हीटी झालेली नाही, ही कार्यशाळा आलेली मरगळ घालवायला खूप महत्त्वाची ठरेल. यानिमित्तानं कलेचा प्रवाह पुन्हा वाहायला लागेल. नवोदितांना ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. कार्यशाळेत समकालीन कलेवर चर्चा होईल. स्थानिक शाळांतील मुलांनाही यात सहभागी करून घेतलं जाईल. दोन दिवसात जी चित्रे तयार होतील, त्या साऱ्यांचा प्रदर्शन 21 रोजी या घाटावरच भरवण्यात येईल. यानंतर ते सांगलीतही भरवले जाईल, अशी माहिती विलास गोसावी, चित्रकार सुरेश पंडित, बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

मान्यवर चित्रकार होणार सहभागी

या कार्यशाळेत सुरेश पंडित, संजय शेलार, संजय नायकवडी, अन्वर हुसेन, एस. निंबाळकर, गजानन कबाडे, बाळासाहेब पाटील, अनिल अभंगे, फारुक नदाफ, संजय क्षीरसागर, वैशाली पाटील, हणमंत लोहार, अमित ढाणे, आप्पासाहेब घाटगे, सत्यजित वरेकर, रोहन कुंभार, नागेश हंकारे, रवींद्र पोतदार, विकास कर्वे, प्रसाद पेंडुरकर, प्रदीप पाटील, शशिकांत जगताप, गणेश पोतदार, रवी शिंदे, विनायक पुरीबुवा, अभिजित पाटील, हर्षवर्धन देवताळे, महेंद्र सौंदत्ते, सिद्धार्थ गावडे, दत्ता मागाडे हे चित्रकार सहभागी होत आहेत.

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com